मोशी, डुडुळगावात बिबट्याची दहशत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 02:19 AM2019-02-03T02:19:17+5:302019-02-03T02:19:51+5:30

डुडुळगाव (ता. हवेली) वन विभागात शुक्रवारी दुपारी बिबट्या दिसल्याने परिसरात दहशतीचे वातावरण होते. वन विभागाच्या पथकाला चकवा देत बिबट्याने धूम ठोकली. असे असले, तरी शनिवारी सकाळी शेतामध्ये बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले आहेत.

leopard in Moshi, Dudulgaon | मोशी, डुडुळगावात बिबट्याची दहशत

मोशी, डुडुळगावात बिबट्याची दहशत

googlenewsNext

मोशी -  डुडुळगाव (ता. हवेली) वन विभागात शुक्रवारी दुपारी बिबट्या दिसल्याने परिसरात दहशतीचे वातावरण होते. वन विभागाच्या पथकाला चकवा देत बिबट्याने धूम ठोकली. असे असले, तरी शनिवारी सकाळी शेतामध्ये बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले आहेत.
आळंदी हद्दीतील गजाननमहाराज संस्थानच्या भक्त निवासाच्या मागील डोंगरावर काळा खडक येथे दुपारी एकच्या सुमारास असलेल्या घरांपाशी महिलेला बिबट्या दिसला. त्यानंतर संबंधित महिलेने आरडाओरडा केल्याने बिबट्याने डुडुळगावकडे धूम ठोकली. बघ्यांची गर्दी उसळल्याने बिबट्याने दाट झुडपांत आश्रय घेतला. पुणे वन परिक्षेत्राचे वन विभाग अधिकारी दुपारी चारच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याने झुडपातून बाहेर पडत धूम ठोकल्यानंतर रेंजरने भूल देण्याचा प्रयत्न म्हणून फायर केले. परंतु तो प्रयत्न अयशस्वी ठरला.
दरम्यान, बिबट्या भक्ष्याच्या शोधात रहदारी असलेल्या भागात आला असावा, असा अंदाज व्यक्त केला. मात्र बिबट्याने कोणावरही हल्ला केलेला नाही किंवा त्याच्यामुळे जनावरांना धोका झाला नसल्याचे वन विभागाकडून सांगितले.

वन विभागाचे अधिकारी विष्णू गायकवाड, दया ढोमे, अनिल राठोड, भाऊसाहेब शिंदे, दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विवेक लावंड, सहायक पोलीस निरीक्षक गिरी, कात्रज विभागाचे बचाव पथक व पोलीस कर्मचारी यांनी पाहणी केली.

डुडुळगाव येथून पुढे बिबट्या गेला असल्याचे सांगितले जात आहे. असे असले, तरी मोशी येथील शेतकऱ्यांच्या शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले आहेत. राजू आल्हाट यांच्या इनाम खोºयातील शेतात कडीपत्ता आहे. या शेताला त्यांनी दोन दिवसांपूर्वी पाणी दिले होते. शनिवारी सकाळी ते शेतात गेले असता त्यांना शेतात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरात पुन्हा भीतीचे वातावरण आहे.

Web Title: leopard in Moshi, Dudulgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.