‘जीएसटी’चे अधिकाऱ्यांना धडे
By Admin | Published: July 7, 2017 03:24 AM2017-07-07T03:24:48+5:302017-07-07T03:24:48+5:30
वस्तू व सेवाकर कायदा अर्थात जीएसटी कायद्याची माहिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यासाठी
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : वस्तू व सेवाकर कायदा अर्थात जीएसटी कायद्याची माहिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. नवीन करप्रणालीचे धडे देण्यात आले.
चिंचवड येथील आॅटो क्लस्टरच्या सभागृहात आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांच्या हस्ते झाले. या वेळी मुख्य लेखापाल राजेश लांडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, मुख्य लेखापरीक्षक पद्मश्री तळदेकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, सहायक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, डॉ. प्रवीण अष्टीकर, चंद्रकांत इंदलकर, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, संदीप खोत, विजय खोराटे, अयुबखान पठाण, कार्यकारी अभियंता सतीश इंगळे उपस्थित होते. वस्तू व सेवाकराबाबतच्या कायद्याची माहिती सनदी लेखापाल रुतुराज चिंगळे व स्वरूप चिंगळे यांनी सादरीकरणाद्वारे दिली. मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी प्रास्ताविक केले.
अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांनीही मनोगत व्यक्त केले. अण्णा बोदडे यांनी सूत्रसंचालन केले. वस्तू व सेवा कराबाबत महापालिकेशी संबंधित माहिती या वेळी सादरीकरणाद्वारे देण्यात आली.