Chinchwad By Election: मतदार राजा जागा हो,लोकशाहीचा धागा हो; चिंचवडमध्ये जनजागृतीसाठी अवलिया रस्त्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 01:21 PM2023-02-26T13:21:17+5:302023-02-26T13:21:47+5:30
गेल्या ३५ वर्षांपासून हे ग्रामपंचायत ते लोकसभेच्या सर्व निवडणूक प्रक्रियेत जनजागृती करत आहेत
चिंचवड: विधानसभा पोट निवडणूकीत मतदरांनी मतदानाचा हक्क बजवावा व निर्भिड पणे मतदान करावे यासाठी एक आवलिया चिंचवड विधानसभा मतदार संघात भटकांती करत फिरत आहे.'मतदार राजा जागा,लोकशाहीचा धागा हो,असा संदेश देत मतदरांना आवाहन करत आहे.
चिंचवड विधानसभा पोट निवडणूक प्रक्रिया आज पार पडत आहे.मात्र दुपार पर्यंत मतदार बाहेर येत नसल्याचे आकडेवारी वरुन दिसत आहे. यासाठी चिंचवड मधील विविध भागात बापूराव दगडोपंत गुंड हे मतदार जनजागृती साठी आवाहन करत आहेत. मतदरांनी मतदानाचा हक्क बजवावा या साठी ते पुण्यातील फुरसूंगी येथून थेट चिंचवड मध्ये दाखल झाले आहेत. डोक्यावर मोठी टोपी व अंगावर मतदानाचे संदेश देणारा शर्ट परिधान करून ते जागोजागी जनजागृती करीत आहेत.
गुंड हे उच्च शिक्षित असून त्यांनी आत्ता पर्यंत समाज प्रबोधन करणारी सहा पुस्तके लिहिली आहेत. १०० टक्के मतदान व्हावे या साठी त्यांनी पुणे ते दिल्ली असा उलटा चालण्याचा प्रकार दोन वेळा केला आहे. भारतीय निवडणूक आयोग,प्रधानमंत्री कार्यालय व लोकसभा सभापती यांना या साठी निवेदन देऊन जंतर मंतर वर उपोषण सुद्धा केले आहे. गेली ३५ वर्षा पासून ते ग्रामपंचायत ते लोकसभेच्या सर्व निवडणूक प्रक्रियेत जनजागृती करत आहेत. आज चिंचवड परिसरात त्यांनी केलेल्या आवाहनाला नागरिक प्रतिसाद देत आहेत. त्यांच्या बरोबर नागरिक सेल्फी काढण्यासाठी गर्दी करत आहेत.