थोडाफार दिलासा! पिंपरीत दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत कोरोनामुक्तांचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:45 PM2021-04-29T16:45:58+5:302021-04-29T16:46:34+5:30
फेब्रुवारीपासून रुग्णवाढीस सुरुवात, तर मार्चमध्ये उच्चांक
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात मागील चार दिवसांपासून दैनंदिन रुगसंख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी थोडा का होईना दिलासा मिळाला आहे.
शहरात मागील चार दिवसात ७ हजार ५०८ रुग्णांची नोंद झाली आहे. तर १० हजार १८७ कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत शहरात रोज सरासरी दहा हजार तपासण्या करण्यात येत आहेत. पुढील काही दिवस अशीच स्थिती राहिल्यास रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या कमी होऊ शकते. शहरात सद्यस्थितीत २२ हजार ३११ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी रुग्णालय आणि कोविड केअर सेंटर मध्ये ८ हजार ६६१ रुग्ण दाखल आहेत. तर १३ हजार ५७० रुग्ण गृहवीलगीकरणात उपचार घेत आहेत.
शहरात फेब्रुवारी पासून रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली. मार्च मध्ये रुग्ण संख्येने उच्चाक गाठला. मार्च मध्ये एकूण ३४ हजार ८९ रुग्ण आढळून आले होते. एका महिन्यात झालेली ही सर्वाधिक वाढ होती. तर याच महिन्यात १६४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. ही रुग्ण वाढ एप्रिल मध्ये सुरू राहिली. परंतु एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यानंतर रुग्ण संख्या हळूहळू कमी होत गेली. या महिन्याच्या शेवटी दैनंदिन रुग्ण संख्येचा आलेख कमी होवून कोरोना मुक्तांची संख्या वाढली आहे. राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनेने संसर्गाची साखळी तुडण्यासाठी जे निर्बंध आलेले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात का होईना संसर्ग रोखण्यात यश आले आहे.
मृत्यू मात्र वाढले
शहरात मार्च तुलनेत एप्रिल मध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. सद्यस्थितीत रुग्ण संख्या जरी काही प्रमाणात कमी झाली असली तरी मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. शहरात मागील चार दिवसात २२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
मागील काही दिवसांची आकडेवारी
तारीख रुग्ण बरे झालेले
२५ एप्रिल २२६५ २०२७
२६ एप्रिल १२९३ २४६९
२७ एप्रिल १९८५ २३७६
२८ एप्रिल १९५६ ३३१५
एकूण ७५०८ १०१८७