नियोजन समितीच्या जागेसाठी लॉबिंग, १८ सप्टेंबरला होणार निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 04:26 AM2017-08-27T04:26:12+5:302017-08-27T04:26:27+5:30

पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून सप्टेंबरच्या तिसºया आठवड्यात ही निवडणूक होणार आहे. रिक्त असणा-या चाळीस जागांसाठी निवडणूक रंगणार असून या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.

Lobbying will be held on September 18 for the planning committee's place | नियोजन समितीच्या जागेसाठी लॉबिंग, १८ सप्टेंबरला होणार निवडणूक

नियोजन समितीच्या जागेसाठी लॉबिंग, १८ सप्टेंबरला होणार निवडणूक

Next

पिंपरी : पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून सप्टेंबरच्या तिसºया आठवड्यात ही निवडणूक होणार आहे. रिक्त असणा-या चाळीस जागांसाठी निवडणूक रंगणार असून या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.
येत्या २९ आॅगस्टला या अर्जांची छाननी होणार आहे. ८ सप्टेंबररोजी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत आहे. तर १८ सप्टेंबरला मतदान होणार असून त्याचदिवशी निकाल लागणार आहे. पिंपरी महापालिकेतील भाजपाच्या ८ व राष्ट्रवादी काँग्रेसच्या ५ नगरसेवकांनी अर्ज भरले आहेत.
जिल्ह्यातील विकास कामांसाठी नियोजन समितीकडे केंद्र व राज्य सरकारकडून निधीची तरतूद करण्यात येते. आमदार आणि खासदार यांचा निधीही जिल्हा नियोजन समितीच्या अधिकारामध्येच खर्च करण्यात येतो. या समितीचे अध्यक्ष पालकमंत्री तर सचिवपदी जिल्हाधिकारी
असतात. या समितीवर पक्षीय बलाबलानुसार लोक प्रतिनिधींची वर्णी लागते. पुणे जिल्ह्यात
भाजपाची ताकद पहिल्यांदाच वाढली असल्याने ही निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

तेरा उमेदवारी अर्ज
महापालिकेतून सत्ताधारी भाजपाकडून आठ नगरसेवकांनी आणि राष्ट्रवादीकडून पाच नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. भाजपाकडून अनुसूचित जाती प्रवर्गातून स्थायी समितीच्या सभापती सीमा सावळे, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) जयश्री गावडे, नागरिकांचा मागास प्रवर्ग (पुरुष) नामदेव ढाके, शत्रुघ्न काटे, खुल्या प्रवर्गातून सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नितीन लांडगे, सर्वसाधारण महिला गटातून माई ढोरे व आरती चोंधे यांनी अर्ज सादर केले आहेत. तर, राष्ट्रवादीकडून अनुसूचित जाती प्रवर्गातून सुलक्षणा धर, खुल्या प्रवर्गातून नगरसेवक आणि राष्टÑवादी काँग्रेसचे युवकाध्यक्ष मयूर कलाटे, सर्वसाधारण महिला प्रवर्गातून उषा वाघेरे, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) प्रज्ञा खानोलकर, नागरिकांचा मागास प्रवर्ग (पुरुष) श्याम लांडे यांनी अर्ज दाखल केले आहेत.

अशी मिळणार संधी
चाळीस जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. जिल्हा परिषदेच्या ७५ सदस्यांमधून सतरा जणांची तर महापालिकेच्या २८७ जागांमधून २१ सदस्य निवडले जाणार आहेत. नगरपालिकेच्या २९१ जागांमधून दोन जागा निवडण्यात येणार आहेत. शासन नियुक्त १८ आणि दोन जागा राज्यपाल नियुक्त आहेत.

 

Web Title: Lobbying will be held on September 18 for the planning committee's place

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.