स्थानिकांना नाही रोजगार
By admin | Published: May 31, 2016 02:00 AM2016-05-31T02:00:06+5:302016-05-31T02:00:06+5:30
आपली शेतजमीन उद्योगनगरीच्या विकासाला देऊन अल्पभूधारक झालेल्या स्थानिक शेतकऱ्यांनाच्या मुलांवरच बेरोजगार राहण्याची वेळ आली आहे
मोशी : आपली शेतजमीन उद्योगनगरीच्या विकासाला देऊन अल्पभूधारक झालेल्या स्थानिक शेतकऱ्यांनाच्या मुलांवरच बेरोजगार राहण्याची वेळ आली आहे. स्थानिक म्हणून सर्व पात्रता पूर्ण करूनही नोकरीपासून डावलल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत.
नोकरी देणे हा कंपनीच्या व्यवस्थापनाचा अधिकार असल्याने डावलले गेल्यास तक्रारही दाखल करता येत नाही. यावर राजकीय वरदहस्ताशिवाय दुसरा उपायही सापडत नाही. ज्या तरुणांना असा वरदहस्त लाभत नाही त्यांना मात्र बेरोजगारीच्या दलदलीतून बाहेर पडणे अशक्य होत आहे.
उद्योगनगरीतील अशा बेरोजगारांची संख्या हजारोंच्या वर असून दर वर्षी त्यात भरच पडत आहेत. स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये सामावून घेण्याकरिता आणि त्यांना आवश्यक ते कौशल्य आत्मसात करण्याकरिता शासनाने परिसरात औद्योगिक प्रशिक्षण संस्था उभारल्या आहेत. येथील स्थानिक मुलेही येथून प्रशिक्षण पूर्ण करीत असतात. त्यानंतर त्यांना सहा महिन्यांच्या अनुभव प्रशिक्षणास सरकारी, निमसरकारी वा काही बड्या कंपन्यांमध्ये रुजू करण्यात येते. (वार्ताहर)