लोकसभा निवडणूक कार्यक्रम : पिंपरी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर भिस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 12:59 AM2019-02-09T00:59:03+5:302019-02-09T00:59:40+5:30
पुणे महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे महापालिका प्रशासन चक्रावले होते.
पिंपरी - पुणे महापालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे महापालिका प्रशासन चक्रावले होते. याशिवाय पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा निवडणूक निर्णय अधिका-यांनीही लोकसभा निवडणुकीकरिता कर्मचारी पुरविण्याची स्वतंत्र मागणी केल्याने या गोंधळात आणखी भर पडली आहे.
आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय कार्यवाही सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागणी केल्याने महापालिका प्रशासनाने माहिती दिली आहे.
आठ हजार कर्मचाºयांची माहिती दिली असून, त्यांपैकी चार हजार कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेतील आहेत. उर्वरित चार हजार कर्मचारी निवडणुकीच्या इतर कामास उपयोगात आणले जाणार आहेत. आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते.
सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार केला. मार्गदर्शन मागविले होते. त्यावर दोन दिवस वाट पाहण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर महापालिका प्रशासनाला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सूचना दिल्या आहेत. त्यानुसार लोकसभा निवडणुकीसाठी उपलब्ध करुन दिल्या जाणाºया मनुष्यबळाची माहिती एकत्रित संकलित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावर महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांना विभागातून उपलब्ध होणाºया मुनष्यबळाची यादी प्रशासन विभागाला सादर केली. त्यानुसार आठ हजारांपैकी ३ हजार ८१६ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांचाही समावेश आहे. त्यामध्ये १५६ अपंग आणि १४ सेवानिलंबित कर्मचाºयांची माहिती आणि यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेला सादर करण्यात आली आहे.