लोकमत 'लोक'जीबी विशेष: महिला अत्याचाराविरोधातील कायद्याचा उपयोग होत नाही, नगरसेविकांचे मत
By प्रमोद सरवळे | Published: March 7, 2024 12:27 PM2024-03-07T12:27:47+5:302024-03-07T12:29:47+5:30
महिला अत्याचाराविरोधात उपयोग होताना दिसत नाही, कायद्याचा दुरुपयोग करून गुन्हेगार गुन्हे करत आहेत
पिंपरी : देशभरात होत असलेल्या महिलांच्या अत्याचारामध्ये वाढ होत आहे. झारखंडमधील झालेला सामूहिक अत्याचाराचा प्रकार अत्यंत निंदाजनक आहे. मणिपूरमधील घटना, पिंपरी चिंचवडमधील क्रिएटिव्ह अकॅडमीमधील अत्याचाराचा मुद्दा गंभीर असून त्यासाठी लवकरात लवकर कडक कायदा केला पाहिजे, अशी मागणी माजी नगरसेविका, सीमा सावळे आणि सुजाता पालंडे यांनी केली.
यावेळी बोलताना सुलभा उबाळे म्हणाल्या, महिला अत्याचाराविरोधात जरी कडक कायदे असले तरी त्याचा काही उपयोग होताना दिसत नाही. कायद्याचा दुरुपयोग करून गुन्हेगार गुन्हे करत आहेत. प्रशासनाचा धाक संपला असून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे.
माजी नगरसेवक सचिन भोसले यांनीही महिला अत्याचाराबद्दल चिंता व्यक्त केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, झारखंडमधील अत्याचारामुळे जगभरात आपल्या देशाची नाचक्की झाली आहे. देशासह राज्यात एकही कडक कायदा नाही. त्यामुळे गुन्हेगारांचे फावत आहे. महिलांना न्याय देण्यासाठी सर्वांनी पक्षभेद विसरून एकत्र आले पाहिजे.
माजी नगरसेवक एकनाथ पवार म्हणाले, गेल्या दोन प्रशासक राजमध्ये पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना लुटले जात आहे. शहरातील पाण्याचा मुद्दाही पवार यांनी मांडला.