‘लोकमत’तर्फे चिंचवडला रंगणार नाट्यमहोत्सव, २६, २७ व ३० डिसेंबरला आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 01:07 AM2018-12-25T01:07:16+5:302018-12-25T01:07:37+5:30

पिंपरी-चिंचवड शहराच्या सांस्कृतिक चळवळीत भर टाकणारा लोकमत सखी मंचाच्या वतीने दिनांक २६, २७ आणि ३० डिसेंबरला ‘नाट्य महोत्सव २०१८’चे आयोजन केले आहे.

'Lokmat' Organized Natya Mahotsav in Chintwad | ‘लोकमत’तर्फे चिंचवडला रंगणार नाट्यमहोत्सव, २६, २७ व ३० डिसेंबरला आयोजन

‘लोकमत’तर्फे चिंचवडला रंगणार नाट्यमहोत्सव, २६, २७ व ३० डिसेंबरला आयोजन

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या सांस्कृतिक चळवळीत भर टाकणारा लोकमत सखी मंचाच्या वतीने दिनांक २६, २७ आणि ३० डिसेंबरला ‘नाट्य महोत्सव २०१८’चे आयोजन केले आहे. एचपी ज्वेलर्सप्रस्तुत आणि फॉर्च्युन वास्तुशिल्प डेव्हलपर्स यांच्या सहयोगाने नाट्य महोत्सव होणार आहे. ‘सर्किट हाऊस’, ‘अमर फोटो स्टुडिओ’, ‘आमच्या ‘ही’चं प्रकरण’ हे नाट्यप्रयोग सादर होणार आहेत. दर्जेदार नाटके पाहण्याची संधी सखी मंच सदस्यांसह त्यांच्या कुटुंबीयांना मिळणार आहे.
लोकमतच्या वतीने औद्योगिकनगरीत नाट्यमहोत्सव आयोजित करण्याची परंपरा सुरू केली आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात महोत्सव होणार आहे. भाऊसाहेब भोईर मित्र परिवाराच्या सहकार्याने हा महोत्सव होत आहे. विविध विषयांवरील नाटकांचा समावेश असलेला हा महोत्सव शहरवासीयांसाठी पर्वणीच ठरणार आहे. २६ डिसेंबरला (बुधवार) विजय केंकरे दिग्दर्शित आणि भूमिका थिएटर्सचे ‘सर्किट हाऊस’ हे नाटक सायंकाळी पाचला होणार आहे. त्यात संजय नार्वेकर, भूषण कडू, अनिल कामत यांच्या प्रमुख भूमिका आहेत. २७ डिसेंबरला (गुरुवार) सायंकाळी पाचला सुनील बर्वे प्रस्तुत आणि सुबकनिर्मित निपूण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘अमर फोटो स्टुडिओ’ हे नाटक होईल. त्यात अमेय वाघ, सखी गोखले, पूजा ठोंबरे, सुव्रत जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर ३० डिसेंबरला (रविवार) दुपारी १२ला सचिन गोस्वामीदिग्दर्शित एकदंत प्रकाशित ‘आमच्या ‘ही’चं प्रकरण’ हे नाटक होईल. त्यात निखिल रत्नपारखी, भार्गवी चिरमुले, नंदिता पाटकर, आनंद काळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

तिकीट विक्री सुरू
१सखी मंच सदस्यांसाठी प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे तिकीटविक्री सुरू आहे. लोकमत सखी मंच सदस्यांना २०१८च्या ओळखपत्रावर १०० रुपये प्रतिनाटक तिकीटदर आहे. लहान मुलांना प्रवेश नसून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असेल. यासह काही जागा निमंत्रितांसाठी राखीव असून, कार्यक्रमाचे सर्व हक्क आयोजकांकडे राखीव राहतील. अधिक माहितीसाठी ०२०-६७३४५६७८, ८३७८९९९७५९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सुवर्ण सखी लकी ड्रॉ योजना
२एचपी ज्वेलर्स हिंमतलाल पी. अ‍ॅण्ड ब्रदर्सप्रस्तुत लोकमत सखी मंच सुवर्ण सखी योजना २०१८ आयोजित केली आहे. यामध्ये सखी मंच सदस्यांना सोने व चांदीची लाखोंची बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध झाली आहे. हा लकी ड्रॉ जिल्हास्तरीय असून, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण विभागातून विजेता ठरणार आहे. पहिले बक्षीस एक लाखाचे सोन्याचे दागिने, दुसरे बक्षीस ७५ हजारांचे, तर तिसरे बक्षीस ५० हजारांचे सोन्याचे दागिने असे असेल.

 

Web Title: 'Lokmat' Organized Natya Mahotsav in Chintwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.