‘लोकमत प्रॉपर्टी शोकेस २०१८’ : कोट्यवधींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 01:51 AM2018-10-15T01:51:09+5:302018-10-15T01:51:25+5:30

पिंपरी : स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असलेल्या पिंपळे निलख, वाकड परिसरात लोकमतच्या वतीने आयोजित केलेल्या ‘ लोकमत प्रॉपर्टी ...

'Lokmat Property Showcase 2018': Turnover of crores | ‘लोकमत प्रॉपर्टी शोकेस २०१८’ : कोट्यवधींची उलाढाल

‘लोकमत प्रॉपर्टी शोकेस २०१८’ : कोट्यवधींची उलाढाल

Next

पिंपरी : स्मार्ट सिटी म्हणून विकसित होत असलेल्या पिंपळे निलख, वाकड परिसरात लोकमतच्या वतीने आयोजित केलेल्या ‘लोकमत प्रॉपर्टी शोकेस २०१८’ला मोठा प्रतिसाद मिळाला. हजारो आयटीयन्सने भेट देऊन स्वप्नातील घर, प्लॉट आरक्षित केले. घरकुल प्रदर्शनातून कोट्यवधींची उलाढाल झाली. 


‘लोकमत’च्या वतीने आजवर अनेक पायंडे पाडले आहे. त्यांपैकी प्रॉपर्टी शोकेस हा एक उपक्रम आहे. स्मार्ट सिटीतील पॅनसिटीत निवड झालेल्या परिसरात प्रथमच प्रॉपर्टी शोकेसचे आयोजन केले होते. औंध-वाकड रस्त्यावरील यशोदा गार्डन येथे दोन दिवस सुरू असणाऱ्या गृहप्रदर्शनाचा आजचा शेवटचा दिवस होता. शनिवारी प्रदर्शनास मोठा प्रतिसाद मिळाला होता. रविवार सुटीचा दिवस असल्याने स्वप्नातील घर साकारण्यासाठी ‘लोकमत प्रॉपर्टी शोकेस’ला आज हजारो नागरिकांनी भेट दिली. सकाळपासूनच गर्दी दिसून येत होती. ग्राहक सदनिका आणि प्लॉटची माहिती घेत होते. दुपारनंतर ही गर्दी अधिक वाढू लागली. प्रदर्शन संपेपर्यंत ग्राहकांची मोठी गर्दी दिसून आली.


अत्यंत वेगाने विकसित होणारे वाकड, हिंजवडी हा परिसर असून प्रशस्त रस्ते, उड्डाणपुलांची उभारणी केली आहे. रस्ते, उद्याने, बागा,
शाळा यांची आरक्षणे विकसित होत आहेत.


शहराच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर गृहसंकुल विकसित होत आहेत. विविध प्रकारच्या घरांचे पर्याय प्रदर्शनात उपलब्ध होते. तसेच विविध बक्षीस योजनाही जाहीर केल्या होत्या. जीएसटीतून सूट देण्याची योजना काहींनी आखली होती.

Web Title: 'Lokmat Property Showcase 2018': Turnover of crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Lokmatलोकमत