स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोणावळा शहराचा देशात सातवा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 04:37 PM2018-06-23T16:37:12+5:302018-06-23T16:38:58+5:30

भारत देशातील सर्व राज्य व शहरांमध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात 1 लाखांहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये लोणावळा शहराचा देशात सातवा क्रमांक आला आहे.

Lonavla city number seventh in clean survey campaign | स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोणावळा शहराचा देशात सातवा क्रमांक

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात लोणावळा शहराचा देशात सातवा क्रमांक

Next

 लोणावळा : भारत देशातील सर्व राज्य व शहरांमध्ये राबविण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात 1 लाखांहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये लोणावळा शहराचा देशात सातवा क्रमांक आला आहे. नुकताच या सर्वेक्षणाचा निकाल जाहिर करण्यात आला. देशात पहिला दहा शहरांमध्ये लोणावळा हे पुणे जिल्ह्यातील एकमेव शहर आहे.

      सहा महिन्यापुर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी य‍ांच्या संकल्पनेतून स्वच्छ सर्वेक्षण अभियानाला सुरुवात झाली. हे अभियान सुरु होण्याच्या किमान वर्षभर अगोदरपासूनच लोणावळा शहरात स्वच्छ मोहिमांना सुरुवात झाली होती. यातच हे सर्वेक्षण सुरु झाल्याने लोणावळा नगरपरिषदेच्या सोबत येथील लोणावळा शहर पत्रकार संघ, लोणावळा शहर चित्रकार ग्रुप, विविध सामाजिक संघटना, राजकिय पक्ष व नागरिक यांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवत लोणावळा शहरातील प्रत्येक भाग हा स्वच्छ करण्याकरिता प्रयत्न केले.

     या अभियानाला नागरिक‍ांची साथ मिळाल्याने स्वच्छ सर्वेक्षण 2018 ही लोणावळेकरांची मोहिम बनली होती. यातच शहरातील चित्रकार मंडळींनी विनामोबदला शहरातील सर्व भिंतीवर आकर्षक चित्र रेखाटत शहराचे रुपडे बदले तर पत्रकार संघाने नगरपरिषदेच्या सोबत स्वच्छ सर्वेक्षण या विषयावर चित्रकला स्पर्धा घेतली. या उपक्रमाला राज्यांच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी भेट देत मुलांशी संव‍ाद साधला होता. विशेष म्हणजे ह्या दोन्ही उपक्रमांना देशात अनुक्रमे पाचवा व दुसरा क्रमांक मिळाला होता. केवळ शहराती रस्ते किंवा कचराकुंड्या साफ न करता प्रत्येक विभागात जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, आरोग्य विभागाच्या माजी सभापती पुजा गायकवाड, विद्यमान सभापती बिंद्रा गणात्रा व त्यांच्या सरव सहकार्याने केले. नगरपरिषदेच्या प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी या सर्वेक्षणाकरिता झोकून देऊन काम केले. नागरिकांच्या सहभागाशिवाय हे शक्य नसल्याची प्रतिक्रिया मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली आहे. सामुहिक प्रयत्नांचे हे यश असल्याचे सांगत या मोहिमेत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग नोंदविलेल्या सर्वांनी त्यांनी या यशाचे मानकरी ठरविले आहे.

Web Title: Lonavla city number seventh in clean survey campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.