लोणावळा उप निबंधकाला २५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 11:13 AM2020-11-26T11:13:36+5:302020-11-26T11:14:01+5:30

लोणावळा दुय्यम निबंधक कार्यालयात बुधवारी सायंकाळी सापळा लावत ही कारवाई करण्यात आली. 

Lonavla Deputy Registrar arrested for accepting bribe of Rs 25,000 | लोणावळा उप निबंधकाला २५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक

लोणावळा उप निबंधकाला २५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी अटक

googlenewsNext

लोणावळा : खरेदी केलेल्या जमिनीची खरेदी नोंद लोणावळा दुय्यम निबंधक कार्यालयात करण्यासाठी तक्रारदाराकडे 30 हजार रुपयांची मागणी करत तडजोड अंती ठरलेली २५ हजार रुपयांची रोकड कार्यालयातील एका व्यक्ती द्वारे स्विकारल्याप्रकरणी दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ  पकडले. बुधवारी (दि.25) रोजी सायंकाळी लोणावळा दुय्यम निबंधक कार्यालयात सापळा लावत ही कारवाई करण्यात आली. 

 लोणावळा दुय्यम निबंधक कार्यालयातील उपनिबंधक आर.जे.भोसले व खाजगी इसम रमेश आंद्रे यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

  वाकसई देवघर ग्रामपंचायत हद्दीमधील एका जागेची खरेदी नोंद घालण्यासाठी लोणावळा उपनिबंधक हे पैशाची मागणी करत नोंद घालण्यास विलंब करत होते. यामुळे त्रासलेल्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधत माहिती दिल्यानंतर लाचलुचपत विभागाचे पोलीस अधिक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत चौधरी, पोलीस हवालदार मुस्ताक खान, पोलीस शिपाई किरण चिमटे, माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Lonavla Deputy Registrar arrested for accepting bribe of Rs 25,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.