लोणावळा दुहेरी हत्याकांड - डोक्याला मार लागल्याने मृत्यू

By Admin | Published: April 4, 2017 08:46 PM2017-04-04T20:46:07+5:302017-04-04T21:01:25+5:30

लोणावळा दुहेरी हत्याकांडातील महाविद्यालयीन दोघा विद्यार्थ्यांचा मृत्यू हा त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने झाला असल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात

Lonavla double murder - death due to headache | लोणावळा दुहेरी हत्याकांड - डोक्याला मार लागल्याने मृत्यू

लोणावळा दुहेरी हत्याकांड - डोक्याला मार लागल्याने मृत्यू

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 4 - लोणावळा दुहेरी हत्याकांडातील महाविद्यालयीन दोघा विद्यार्थ्यांचा मृत्यू हा त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने झाला असल्याचे शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले असल्याची माहिती तपास अधिकारी चंद्रकांत जाधव यांनी दिली. तसेच या अहवालानुसार सदर मयत विद्यार्थिनीसोबत लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे या प्राथमिक अहवालातून समोर आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
आयएनएस शिवाजी ते एअरफोर्स दरम्यानच्या एस पाँईट या ठिकाणी सिंहगड महाविद्यालयातील मँकेनिकल इंजिनिअरिंगच्या तिसर्‍या वर्गात शिकणारा विद्यार्थी सार्थक दिलिप वाकचौरे (वय २२, रा. चणेगावरोड, सात्रळ, राहुरी सोनगाव, जिल्हा अहमदनगर) व सिंहगड विद्यालयातच संगणकीय इंजिनिअरिंगच्या तिसर्‍या वर्गात शिकणारी श्रुती संजय डूंबरे (वय २१, रा. गेस्ट हाऊस ओतुरजवळ ता. जुन्नर, जि. पुणे) या दोघांचे मृतदेह काल सोमवारी दुपारी २ च्या सुमारास एका वृद्ध व्यक्तीला झुडपांमध्ये संशयास्पद दिसून आले होते. याबाबत त्यांनी या मार्गावरुन जाणारे सुनील दिलीप इंगूळकर यांना माहिती दिली. इंगूळकर यांनी याबाबत लोणावळा शहर पोलिसांना माहिती दिल्यानंतर सदरची घटना उघड झाली. घटनास्थळी दोघांचे मृतदेह विवस्त्र अवस्थेत आढळले होते. तसेच मुलीचे तोंड हे कपड्याने बांधले होते व दोन्ही हात पाठीवर बांधलेले होते. यामुळे प्रथम दर्शनी ही हत्या की आत्महत्या याबाबत संभ्रम होता. रात्री उशिरा लोणावळा पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्याविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आज सकाळी पुण्यातील ससून रुग्णालयात मयत श्रुती व सार्थक यांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. यामध्ये दोघांचाही मृत्यू हा डोक्यात गंभीर मार लागला असल्याने झाला असल्याचे समोर आले. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.  
 
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा लोणावा पोलीस ठाण्यावर कँन्डल मार्च
- सिंहगड महाविद्यालयात मँकेनिकल अभियांत्रिकीच्या तिसर्‍या वर्गात शिकणारा विद्यार्थी सार्थक वाकचौरे व संगणकिय अभियांत्रिकीच्या तिसर्‍या वर्गात शिकणारी विद्यार्थींनी श्रुती डुंबरे यांचा खून करणार्‍या आरोपींना तात्काळ अटक करुन त्यांचा खटला जलदगती न्यायालयात चालवा या मागणीचे निवेदन देण्यासाठी महाविद्यालयातील जवळपास चार हजार विद्यार्थ्यांनी सिंहगड महाविद्यालय ते लोणावळा शहर पोलीस ठाण्यापर्यंत कँन्डल मार्च मोर्चा शांततेच्या मार्गाने काढत तपास अधिकारी चंद्रकांत जाधव यांना निवेदन दिले.
 
खुनाच्या तपासासाठी आठ पथके - सुवेझ हक
सिंहगड महाविद्यालयात शिकणार्‍या विद्यार्थी व विद्यार्थींनी यांच्या खून झाल्याचे प्रकार हा भयंकर असून खूनातील आरोपींचा शोध घेण्यासाठी आठ पथके तयार करण्यात आली असून तपास सुरु असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले गुन्ह्याची उकल करण्यासाठी सायबर सेलची देखील मदत घेण्यात आली असून तपास वेगात सुरु केला आहे.
 
सार्थक हा मनमिळाऊ तर श्रुती ही टाँपर विद्यार्थीनी
- सार्थक वाकचौरे हा सिंहगड महाविद्यालयातील हरहुन्नरी विद्यार्थी होता. महाविद्यालयात प्रत्येक सांस्कृतीक कार्यक्रमात सार्थक हा आघाडीवर असायचा त्यांच्या सहभागा शिवाय कार्यक्रम यशस्वीच होत नसे असे सार्थकचे रुममेट असलेले आशिष दाभाडे याने लोकमतशी बोलताना सांगितले. संकेत अंत्रे, संदेश मोरे, योगेश नवसारे, तेजस खालकर व सार्थक हे सहाजण भांगरवाडी येथे भाड्याने खोली घेऊन रहात होते. तर श्रुती ही मयाविद्यालयाच्या हाँस्टेलमध्ये रहात होती. ती महाविद्यालयातील टाँपर विद्यार्थींनी होती. मागील तिन ते चार वर्षापासून ते दोघे चांगले मित्र होते व दोघेही मनमिळाऊ होते असे त्यांच्या मित्रांनी सांगितले. त्यांची महाविद्यालयात कोणाशीही वाद नव्हते असेही त्यांनी सांगितले.
 

Web Title: Lonavla double murder - death due to headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.