‘लोणावळा’ ठरले पश्चिम भारतातील दुसऱ्या क्रमाकांचे स्वच्छ शहर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 04:47 PM2019-03-06T16:47:10+5:302019-03-06T16:48:14+5:30

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये लोणावळा शहराला पश्चिम भारतातील दुसऱ्या क्रमाकांचे स्वच्छ शहर हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

'Lonavla' was the cleanest city of West India | ‘लोणावळा’ ठरले पश्चिम भारतातील दुसऱ्या क्रमाकांचे स्वच्छ शहर

‘लोणावळा’ ठरले पश्चिम भारतातील दुसऱ्या क्रमाकांचे स्वच्छ शहर

googlenewsNext
ठळक मुद्देदिल्लीत लोणावळा शहराचा स्वच्छतेचा डंका 

लोणावळा : स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये लोणावळा शहराला पश्चिम भारतातील दुसऱ्या क्रमाकांचे स्वच्छ शहर हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. दिल्ली येथे आज स्वच्छ सर्वेक्षण विभागाचे केंद्रिय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते लोणावळा नगरपरिषदेला सदर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पर्यटननगरी अशी ओळख असलेल्या लोणावळा शहराचा आज दिल्लीत स्वच्छतेच्या बाबतीत देखील डंका वाजला आहे. 
    नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार, स्वच्छता व आरोग्य विभागाच्या सभापती संध्या खंडेलवाल, माजी सभापती पुजा गायकवाड, ब्रिंदा गणात्रा यांनी हा सन्मान स्विकारला. यावेळी मावळचे आमदार संजय उर्फ बाळा भेगडे, मावळ प्रबोधनीचे अध्यक्ष रविंद्र भेगडे, नगरसेवक राजु बच्चे, प्रमोद गायकवाड, बाळासाहेब जाधव, रघुवीर शेलार, विज वितरण समितीचे सदस्य सुनिल तावरे हे उपस्थित होते. दिल्याने नागरिकांनी देखिल शहर स्वच्छ करण्यासाठी मोलाचे यो  स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरु होण्याच्या पुवीर्पासून म्हणजेच २०१७ सालापासून लोणावळा शहरात स्वच्छतेचा जागर सुरु झाला होता. मागील दोन वर्षात नगरपरिषदेने घरोघरचा कचरा शंभर टक्के गोळा करण्याचे शिवधनुष्य पेलले सोबतच शहरातील सर्व कचराकुंड्या काढत लोणावळा शंभर टक्के कचराकुंडी मुक्त बनविले. घरोघरी जाऊन नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.

Web Title: 'Lonavla' was the cleanest city of West India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.