खासगी टँकरचालकांकडून लुबाडणूक
By admin | Published: March 27, 2016 02:49 AM2016-03-27T02:49:15+5:302016-03-27T02:49:15+5:30
पाणीटंचाईचा समस्त नागरिक मुकाटपणे सामना करीत असताना काही टँकरचालक मात्र नागरिकांची पाण्याची गरज भागविताना स्वत:चा खिसा गरम करून घेत आहे. यातील काहीजणांना
काळेवाडी : पाणीटंचाईचा समस्त नागरिक मुकाटपणे सामना करीत असताना काही टँकरचालक मात्र नागरिकांची पाण्याची गरज भागविताना स्वत:चा खिसा गरम करून घेत आहे. यातील काहीजणांना नगरसेवकांचाही आशीर्वाद असून, प्रामुख्याने उपनगरांमध्ये असे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. बाटलीबंद शुद्ध पाणी पुरविणाऱ्या काही कंपन्याही यातून मोठा फायदा करून घेत आहेत.
पालिकेकडून नागरिकांसाठी म्हणून स्वस्त दरात पाणी घ्यायचे व नागरिकांना मात्र ते दुप्पट दरात विकायचे, असा प्रकार सुरू आहे. असंख्य टँकर पाणी पुरविण्यासाठी म्हणून वापरले जात आहेत. येत्या दोन महिन्यांत ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. ज्या परिसराला पाणी मिळत नाही, तिथे टँकरद्वारे पाणी पुरविण्याचा पालिकेचा प्रयत्न असतो. हे पाणी विनामूल्य पुरविले जाते; मात्र ते कमी पडते. त्यामुळे सोसायट्या, तसेच खासगी बंगले पालिकेत पैसे जमा करून टँकर मागवतात. (वार्ताहर)