पुणे - मुंबई महामार्गावर नागरिकांना अडवून लूटमार; तिघांना ठोकल्या बेड्या

By नारायण बडगुजर | Published: May 7, 2023 04:19 PM2023-05-07T16:19:00+5:302023-05-07T16:19:49+5:30

आरोपींकडून लॅपटॉप, दुचाकी, कोयता, दोन मोबाईल फोन असा एकूण ९५ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

Looting of citizens on Pune Mumbai highway Shackles hit the three | पुणे - मुंबई महामार्गावर नागरिकांना अडवून लूटमार; तिघांना ठोकल्या बेड्या

पुणे - मुंबई महामार्गावर नागरिकांना अडवून लूटमार; तिघांना ठोकल्या बेड्या

googlenewsNext

पिंपरी : पुणे -मुंबई महामार्गावर नागरिकांना अडवून लूटमार करणाऱ्या तिघांना अटक केली. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केली. आरोपींकडून लॅपटाॅप, दुचाकी, कोयता, दोन मोबाइल फोन, असा एकूण ९५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

अभिषेक लक्ष्मण भोसले (वय २०), विजय सिध्दार्थ म्हस्के (वय २०), शांतकुमार चंद्रशेखर ददुल (वय २०, तिघेही रा. काळेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे -मुंबई महामार्गावर खंडणी विरोधी पथकातील पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना नंबर प्लेट नसलेली एक दुचाकी संशयितरित्या आढळली. पोलिसांनी दुचाकीस्वाराला थांबण्याचा इशारा केला असता तो त्याच्या इतर दोन साथीदारांसोबत पळून जाऊ लागला. पोलिसांनी दुचाकीचा पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यांनी पुणे -मुंबई महामार्गावर एका व्यक्तीला लुटले असल्याची कबुली दिली. या लुटमारप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 

पोलिसांनी आरोपींकडून लॅपटॉप, दुचाकी, कोयता, दोन मोबाईल फोन असा एकूण ९५ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पुढील कारवाईसाठी आरोपींना देहूरोड पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपी अभिषेक लक्ष्मण भोसले व विजय सिध्दार्थ म्हस्के हे पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्या विरुध्द दरोडा व जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद पवार, सहायक निरीक्षक उध्दव खाडे, सहायक फौजदार अशोक दुधवणे, पोलिस कर्मचारी सुनील कानगुडे, विजय नलगे, गणेश गिरीगोसावी, किरण काटकर, प्रदीप गोडांबे व रमेश गायकवाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: Looting of citizens on Pune Mumbai highway Shackles hit the three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.