लिफ्ट देण्याच्या बहाण्याने वयोवृद्ध महिलांना लुटणारे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 07:46 PM2019-12-27T19:46:49+5:302019-12-27T19:48:58+5:30
वयोवृद्ध सहा महिलांना लिप्ट देण्याच्या बहाण्याने वाहनामध्ये बसुन एअरगनचा धाक दाखवून गळ्यातील लाखो रूपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेणा-या अट्टल चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचुन अटक केली.
वडगाव मावळ :वयोवृद्ध सहा महिलांना लिप्ट देण्याच्या बहाण्याने वाहनामध्ये बसुन एअरगनचा धाक दाखवून गळ्यातील लाखो रूपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेणा-या अट्टल चोरट्यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचुन अटक केली. एकून सहा गुन्हे उघडकीस आले आहेत.
विकास तुकाराम जाधव(रा.कामशेत) संतोष उर्फ भावड्या अंकुश वाडेकर(रा.नाणे रोड,कामशेत)यांना अटक केली असून नागेश केवराव गायकवाड, सुदाम साबाजी भांगरे हे दोघे पळून गेले.
वडगाव मावळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ७ तारखेला कान्हे फाटा येथे चिंधाबाई राघू पवार वय ७९ यांना लिप्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसुन धाक दाखवून गळ्यातील दोनतोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते.हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलिस अधिक्षक संदीप पाटील व अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पाटील यांनी स्थानिक गुन्हे वेषन शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदमाकर घनवट यांना याबाबत सुचना दिल्या.
पोलिस निरीक्षक पदमाकर घनवट म्हणाले वडगाव हद्दीत दोन, कामशेत दोन, लोणावळा ग्रामीण एक व चाकण एक असे सहा गुन्हे केल्याची कबुली दिली. सदरचे सोने हे काही सोनारांना विकले असून लवकरच उघडकीस येईल.या चारजणांनी आत्तापर्यत वयोवृद्ध महिलांना लुटले आहे. सहाय्यक पोलिस अधिक्षक नवनित काॅवर याच्या मार्गदर्शनाखाली पदमाकर घनवट सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय पाटील, पृथ्वीराज ताटे, प्रकाश वाघमारे, सचिन गायकवाड, शब्बीर पठान, गणेश महाडीक, रौफ इनामदार यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे कान्हे फाटा येथे सापळा रचून अटक केली. यामधील दोघेजण पळून गेले. अटक केलेल्या दोघांकडून एअरगण, दोन मोबाईल, कार असा ऐवज जप्त केला.