हरवला चिवचिवाट

By admin | Published: March 20, 2016 04:45 AM2016-03-20T04:45:51+5:302016-03-20T04:45:51+5:30

पिंपरी-चिंंचवड शहरात मावळ, माण व मुळशीचा काही भाग वगळता शहरात चिमण्यांचा चिवचिवाट कमी झाला आहे. शहरात शानदार इमारती उभ्या राहिल्याने

Losers | हरवला चिवचिवाट

हरवला चिवचिवाट

Next

पिंपरी : पिंपरी-चिंंचवड शहरात मावळ, माण व मुळशीचा काही भाग वगळता शहरात चिमण्यांचा चिवचिवाट कमी झाला आहे. शहरात शानदार इमारती उभ्या राहिल्याने घरांच्याभोवताली अडगळच शिल्लक राहिली नाही.
२० मार्च रोजी जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त घेतलेला आढावा. शहरात धान्य वाळतानाही आता दिसत नाही. कारण धान्य वाळत असले की, चिमण्या धान्याच्या दिशेने धाव घेत असत. चिमण्यांचा मार्च ते जून हा कालावधी विणीचा हंगाम असतो. साधारणत: दिवसाला चिमण्या तीन ते पाच अंडी घालतात. यासाठी त्यांना अडगळ आवश्यक असते. मात्र, काँक्रिटीकरणाच्या बांधकामामुळे ही अडगळच निघून गेली आहे. चिमण्या खासकरून बांधावर, सुबाभळ, नदीचा किनारा, खुरट्या बाभळी, चिंच, कडूलिंब अशा ठिकाणी जास्त घरटी करीत आहेत. चिमण्यांचे प्रमाण भंडारा डोेंगरावर जास्त आहे. पेरू, चेरी, करवंद, पिंपळाची फळे, बोराची झाडे चिमणीला जास्त आवडतात. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांचे वास्तव्य आढळून येत आहे. मात्र, शहरात अशा झाडांची बांधकामांमुळे मोठी तोड होत आहे. त्यामुळे चिमण्यांचा अधिवास कमी झाला आहे. चिमण्या उंच इमारतीच्या ठिकाणी घरटे करतात ज्या ठिकाणी अतिक्रमण होत नाही. (प्रतिनिधी)

नागरिक सरसावले
शहरात पर्यावरणप्रेमींनी चिमणी बचावासाठी उपाययोजना केल्या आहेत. छतावर मातीचे गोल आकाराचे भांडे ठेवले आहे. काहींनी बर्ड फीडर ठेवलेले आहेत. घराच्या शोभेसाठी आर्टिफि शियल व लाकडी घरटे लावले आहे. सुगरण, बुलबुल, पारवा, साळुंकी अतिक्रमण करून घरटी मोडून काढत आहेत. यासाठी चिमण्यांच्या आकाराएवढीच घरटी हवीत. अशा प्रकारची घरटी नागरिकांनी निर्माण केली आहेत.

Web Title: Losers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.