रसिकांसह मान्यवरांनी केले कौतुक, पुणेरी पाट्या प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 02:00 AM2018-07-10T02:00:53+5:302018-07-10T02:01:30+5:30

‘लोकमत’ तर्फे आयोजित ‘पुणेरी पाट्या’ या प्रदर्शनाला पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तरूण-तरूणींसह ज्येष्ठ नागरिक, महापौर, अधिकारी व मान्यवर मंडळींनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

a lot of response to the Punei Patiya exhibition | रसिकांसह मान्यवरांनी केले कौतुक, पुणेरी पाट्या प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद

रसिकांसह मान्यवरांनी केले कौतुक, पुणेरी पाट्या प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद

Next

पिंपरी : ‘लोकमत’ तर्फे आयोजित ‘पुणेरी पाट्या’ या प्रदर्शनाला पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तरूण-तरूणींसह ज्येष्ठ नागरिक, महापौर, अधिकारी व मान्यवर मंडळींनी हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यावेळी प्रदर्शनातील पुणेरी बाणा अनुभवण्यासाठी गर्दी झाल्यानंतर नागरिकांनी सभागृहाबाहेर रांगा लावल्या होत्या.
महापौर नितीन काळजे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, नगरसेवक मोरेश्वर शेडगे, शिवसेना शहर संघटक सुलभा उबाळे, नगरसेविका करुणा चिंचवडे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, सहायक आयुक्त अण्णा बोदडे, बांधकाम व्यावसायिक मकरंद पांडे, दिलीप सोनिगरा, नितीन धिमधिमे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी प्रदर्शनाला आवर्जुन भेट दिली. या वेळी महापौर काळजे म्हणाले ‘‘पुण्याची ओळखच वेगळी आहे. एक पुणेकर कुठेही नेला तरी झाकला जाऊ शकत नाही. खऱ्या पुण्याची व पुणेकरांची जाणीव पुणेरी पाट्या वाचल्यानंतर होते. माणसाच्या बौद्धिक ज्ञानात भर टाकणाºया अशा या पाट्या आहेत. त्यांचा प्रचार व प्रसार होणे पुणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.’’
नगरसेविका अश्विनी चिंचवडे म्हणाल्या, ‘‘पुणे तेथे काय उणे या प्रमाणे पुण्याची ओळख या पाट्यांमधूनच होते. पुण्यातील लोकांची अस्सल बुद्धिमत्ता या पाट्यांमधून झळकते. त्या लोकांची बुद्धिमत्ता सगळ््यांना जाणून घेता यावी यासाठी लोकमतने केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे.’’
आउट डोअर पार्टनर धिरेंद्र सेंगर म्हणाले, ‘‘पुणेरी पाट्या विचार करायला लावणाºया व काहीतरी नवीन शिकवणाºया आहेत. कुठेतरी आपले काहीतरी चुकत आहे हे सांगणाºया सुचक आहेत, त्यामुळे या पाट्या वाचून नकळत आपल्याकडून होणाºया चुका टाळण्याची संधी आपल्याला आहे.’’
पुणेरी पाट्यांच्या प्रदर्शनाचे खूप आकर्षण होते. एकाच छताखाली पुणे अनुभवण्याची संधी मिळाली. सदाशिव व इतर पेठेंमधील लोकांची बौद्धिकता पाहयला मिळाली, अशी प्रतिक्रिया रसिकांनी व्यक्त केली.

उत्स्फूर्त प्रतिक्रिया
या उपक्रमातून पुणेकरांचा स्पष्ट वक्तेपणाचा गौरव लोकमततर्फे केला गेला. या प्रदर्शनामुळे उद्योगनगरीतील नागरिकांच्या चेहºयावर हास्याची लकेर उमटली. प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या.

व्हॉट्सअ‍ॅपवर चलती
अनेक तरूण-तरूणी पुणेरी पाटीसमोर सेल्फी काढत होते. सेल्फी काढून व्हाटसअपवर स्टेटस टाकून ‘मी पुणेरी पाटी प्रदर्शनास हजेरी लावली’ तुम्हीही या अशा प्रकारचे संदेश मित्र व नातेवाईकांना पाठवले जात होते.
 

Web Title: a lot of response to the Punei Patiya exhibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.