शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष, साॅफ्टवेअर इंजिनियरला २६ लाखांचा गंडा

By नारायण बडगुजर | Published: January 18, 2024 10:32 AM2024-01-18T10:32:58+5:302024-01-18T10:33:14+5:30

पिंपरी : जादा परतावा मिळेल असे साॅफ्टवेअर इंजिनियरला सांगून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानंतर इंजिनियरची २६ लाख रुपयांची ...

Lure of investment in stock market, software engineer gets Rs. 26 lakhs | शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष, साॅफ्टवेअर इंजिनियरला २६ लाखांचा गंडा

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष, साॅफ्टवेअर इंजिनियरला २६ लाखांचा गंडा

पिंपरी : जादा परतावा मिळेल असे साॅफ्टवेअर इंजिनियरला सांगून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानंतर इंजिनियरची २६ लाख रुपयांची फसवणूक केली. पुनावळे येथे १८ नोव्हेंबर २०२३ ते १६ जानेवारी २०२४ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने फसवणुकीचा हा प्रकार घडला.

आशिष श्यामसुंदर कुलकर्णी (३९, रा. पुनावळे) यांनी याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. अनिल शर्मा, आशिष शहा यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष कुलकर्णी हे साॅफ्टवेअर इंजिनियर आहेत. फ्रन्टलाईन के-०४ या व्हाटसअप ग्रुपवर आशिष यांना शेअर मार्केटची माहिती पाठवून शर्मा आणि शहा यांनी त्यांचा विश्वास संपादन केला.

त्यांना जादा परताव्याचे आमिष दाखविले. संशयितांनी सीएचसी-एसएफएस या ॲपवरून २६ लाख १२ हजार रुपयांचे शेअर खरेदी करायला लावले. पुढे त्यांनी ते शेअर विकून आशिष यांना ती रक्कम न देता परस्पर स्वतःच्या खात्यावर घेत त्यांची २६ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक केली. पोलिस उपनिरीक्षक पुरुषोत्तम चाटे तपास करीत आहेत.

Web Title: Lure of investment in stock market, software engineer gets Rs. 26 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.