माण, हिंजवडी ग्रामपंचायती आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 03:50 AM2017-08-01T03:50:15+5:302017-08-01T03:50:15+5:30

कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराने हिंजवडी ग्रामपंचायतीचा कचरा माणच्या हद्दीत आणून टाकला जात असल्याने कचºयाच्या प्रश्नावरून दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.

Maan, Hinjewadi Gram Panchayat face-to-face | माण, हिंजवडी ग्रामपंचायती आमने-सामने

माण, हिंजवडी ग्रामपंचायती आमने-सामने

Next

हिंजवडी : कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराने हिंजवडी ग्रामपंचायतीचा कचरा माणच्या हद्दीत आणून टाकला जात असल्याने कचºयाच्या प्रश्नावरून दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. हिंजवडीतील कचरा उचलणाºया कंत्राटदाराकडून माणच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून कचरा टाकला जात होता़ मात्र ज्या जागेत कचरा टाकला जात होता तेथील शेतकºयांनी या प्रकारास विरोध केला आहे.
यापुढे कचºयाच्या गाड्या माणला आल्या तर कंत्राटदाराच्या गाडीवाल्यांना धडा शिकवला जाईल असा इशारा येथील शेतकरी बजरंग ओझरकर, सचिन ओझरकर, सचिन गवारे, भाऊसाहेब कुºहे, मच्छिंद्र गवारे, राहुल ओझरकर व अन्य शेतकºयांनी दिला आहे.
हिंजवडीत दररोज तयार होणारा हजारो टन ओला सुका कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्याचे कंत्राट विश्वेश एंटरप्रायजेस कंपनीला देण्यात आले आहे. त्यानुसार कंत्राटदाराकडून रोजचा उचलला जाणारा कचरा माणच्या हद्दीत असलेल्या डीएलएफ कंपनीच्या मागील बाजूला असलेल्या कॅनालनजीक पडीक जागेमध्ये टाकला जात असल्याने लगतच्या शेतकºयांची जमीन व पर्यायाने तेथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रोजच्या साठणाºया कचºयामुळे या भागात घाणीची दुर्गंधी सुटली असून तेथील रहिवाशांचे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. रोज हजारो टन कचरा टाकला जात असल्याने या परिसराला कचरा डेपोचे स्वरूप येऊ लागले आहे.
हिंजवडीच्या ठेकेदाराने आणून टाकलेला कचरा तातडीने उचलून न्यावा व यापुढे या जागेत हिंजवडीचा कचरा येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी, अशी मागणी माण ग्रामपंचायतीच्या सरपंच स्मिता भोसले, उपसरपंच संदीप साठे व ग्रामविकास अधिकारी बी. आर. पाटील यांनी हिंजवडी ग्रामपंचायतीच्या प्रशासकांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. यावर हिंजवडी ग्रामपंचायतीने तातडीची बैठक घेऊन पुढील कारवाईस सुरुवात केल्याचे समजते.

Web Title: Maan, Hinjewadi Gram Panchayat face-to-face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.