‘मूँह बोला दाम’ आकारून मालामाल

By admin | Published: April 18, 2017 02:58 AM2017-04-18T02:58:10+5:302017-04-18T02:58:10+5:30

हिंजवडीतील आयटीयन्स शनिवार-रविवारची सुटी गाठून मूळ गावी जातात. त्यातच उन्हाळी सुटीच्या मुहूर्तावर सर्वत्र निघणारे लग्नसोहळे, धार्मिक कार्यक्रम, मूळ

'Maanh baaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa' | ‘मूँह बोला दाम’ आकारून मालामाल

‘मूँह बोला दाम’ आकारून मालामाल

Next

वाकड : हिंजवडीतील आयटीयन्स शनिवार-रविवारची सुटी गाठून मूळ गावी जातात. त्यातच उन्हाळी सुटीच्या मुहूर्तावर सर्वत्र निघणारे लग्नसोहळे, धार्मिक कार्यक्रम, मूळ गावी सुट्या घालविण्यासाठीची लगबग या सर्वांची भर पडल्याने वाकड-हिंजवडीतील ट्रॅव्हल्स व्यावसायिक मूॅँह बोला दाम आकारून मालामाल होत असल्याचे वास्तव आहे.
जगद्विख्यात आयटीपार्कमुळे हिंजवडी, वाकड, थेरगाव, ताथवडे भागात आयटीयन्स आणि बाहेरील नोकरदार वर्गाचे मोठे वास्तव्य, तसेच या भागात मोठ्या प्रमाणावर टुरिस्टरचे देखील प्रमाण वाढले आहे. गलेलठ्ठ पगार असणारा आयटीयन्स वर्ग वेळेत आणि आरामदायी प्रवासासाठी वाट्टेल तेवढे पैसे द्यायला तयार असतो; त्याचाच फायदा ट्रॅव्हल्सवाले घेत आहेत. बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या स्पर्धेमुळे एजंटांचे देखील मोठे जाळे निर्माण झाले आहे. ते देखील या सिझनमध्ये बक्कळ नफा कमवीत आहेत. वर्षातील उन्हाळी, दिवाळी आणि शिमगा हे चार महिन्यांचे तीन सिझन त्यांना अत्यंत महत्त्वाचे असल्याने ट्रॅव्हल्स कंपन्यांनी १० एप्रिलपासून नियमित तिकिटांच्या किमतीत जवळपास ४० ते ५० टक्क्यांनी वाढ केली आहे.
वाकड-हिंजवडी भागात बहुतेक आयटीयन्स पेइंग गेस्ट म्हणून राहतात. मात्र आयटी पार्क हिंजवडीला आठवड्यातून शनिवार आणि रविवार हे दोन दिवस सुट्या असतात. या सुटीचे सोने करीत आयटीयन्स आपल्या घरी जातात. दर शुक्रवारी सायंकाळी येथील वाकड चौक, भूमकर चौक, शनी मंदिर चौक, भुजबळ चौक, ताथवडे या ठिकाणी आयटीयन्सचा लोंढाच पाहायला मिळतो. तासनतास येथील महामार्गावर आयटीयन्स बसची वाट पाहत ताटकळतात.

Web Title: 'Maanh baaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.