महामेट्रोची चमकोगिरी, अनधिकृत फ्लेक्सबाजी, पिंपरी-चिंचवड शहरात वाढल्या जाहिराती  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 02:59 AM2017-09-16T02:59:55+5:302017-09-16T03:00:52+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्यात आला असून, स्वारगेट ते पिंपरी या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम शहरात सुरू झाले आहे. या कामांविषयीची फ्लेक्सबाजी जोरात सुरू असून, त्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नसल्याचे उजेडात आले आहे.

 Magamroto's glossary, unauthorized flexing, increased advertisements in Pimpri-Chinchwad cities | महामेट्रोची चमकोगिरी, अनधिकृत फ्लेक्सबाजी, पिंपरी-चिंचवड शहरात वाढल्या जाहिराती  

महामेट्रोची चमकोगिरी, अनधिकृत फ्लेक्सबाजी, पिंपरी-चिंचवड शहरात वाढल्या जाहिराती  

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश करण्यात आला असून, स्वारगेट ते पिंपरी या मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम शहरात सुरू झाले आहे. या कामांविषयीची फ्लेक्सबाजी जोरात सुरू असून, त्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नसल्याचे उजेडात आले आहे.
पुणे मेट्रोची पायाभरणी गेल्या दहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यानंतर पिंपरी ते स्वारगेट या पहिल्या टप्प्याचे काम पिंपरी येथे सुरू आहे. पिंपरी ते स्वारगेट या मार्गाची लांबी १६.५ किलोमीटर असून, त्यांपैकी पाच किलोमीटरचा मार्ग भुयारी असून, उर्वरित उन्नत मार्ग असणार आहे. त्यात १५ स्थानके असून, त्यांपैकी नऊ पुलांवर, तर भुयारी स्थानके सहा असणार आहेत.
महामेट्रोसाठी पुणे मेट्रो रेल कार्पोरेशनच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहरापासूनच प्रत्यक्षपणे काम सुरू झाले आहे. हा प्रकल्प उभारताना संस्थेने जी उद्दिष्टे ठेवली आहेत, त्यांपैकी प्रत्यक्ष कामांऐवजी चमकोगिरी रस्त्यावरील फ्लेक्सवरून दिसत आहे. मेट्रोच्या कामांमध्ये स्थानिकांना किती रोजगार मिळाला, हा संशोधनाचाच भाग आहे.
पुणे-मुंबई महामार्गावरून दापोडी ते पिंपरी या टप्प्यात वृक्षतोड केल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रथम प्रसिद्ध केले होते. वृक्षतोडीच्या तुलनेत वृक्षसंवर्धनाबाबत मेट्रोचे परिणामकारक धोरण नसल्याचे दिसून येत आहे.

प्रशासनाचे सोयीस्कर दुर्लक्ष
पिंपरी-चिंचवड परिसरातून जाणाºया मार्गावरील काही चौकात मेट्रोने गणेशोत्सवानिमित्त स्वागताचे फ्लेक्स उभारले आहेत. मोरवाडी चौकातून न्यायालयाकडे जाणाºया रस्त्यावर सुप्रीम हॉटेलसमोर, तसेच मोरवाडी चौकातून महापालिकेकडे जाताना अहल्यादेवी होळकर पुतळ्याशेजारी बांबंूच्या साह्याने फ्लेक्सबाजी केली आहे. ही विनापरवना आहे.
 पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील रस्त्यावर महामेट्रोने फ्लेक्सबाजी केली आहे किंवा नाही. याबाबत प्रशासनाकडे माहिती नाही. परवानगीसाठी मेट्रोने कोणताही अर्ज केलेला नाही किंवा आम्ही लेक्स उभारणीसाठी अधिकृतपणे परवानगी दिलेली नाही. याबाबत खात्री करून कारवाई केली जाईल.
- योगेश कडुसकर, सहायक आयुक्त, आकाशचिन्ह परवाना विभाग

गणेशोत्सवातील रस्त्यावर उभारण्यात येणाºया फ्लेक्सचे काम खासगी संस्थेला देण्यात आले होते. त्या फलकांना महापालिकेची परवानगी घेतली किंवा नाही याबाबत आता आमच्याकडे माहिती उपलब्ध नाही. माहिती घ्यावी लागेल. -ई. डी़ रामनाथ,
संचालक, पुणे महामेट्रो

Web Title:  Magamroto's glossary, unauthorized flexing, increased advertisements in Pimpri-Chinchwad cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे