महामेट्रोने दोन अभियंते केले निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 07:07 PM2018-09-03T19:07:28+5:302018-09-03T19:08:43+5:30

मेट्राेच्या खांबाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे विराेधी पक्ष नेते दत्ता साने यांनी निदर्शनास अाणून दिल्याने महामेट्राेकडून दाेन अभियंते निलंबित करण्यात अाले अाहेत.

Mahametro suspended two engineers | महामेट्रोने दोन अभियंते केले निलंबित

महामेट्रोने दोन अभियंते केले निलंबित

googlenewsNext

पिंपरी-चिंचवड : महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी शहरात सुरु असलेल्या महामेट्रोच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा पर्दाफाश केला आहे. खांबाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणल्यानंतर खडबडून जागे झालेल्या महामेट्रोने दोन अभियंत्यांना तडकाफडकी निलंबित केले अाहे.

स्वारगेट ते पिंपरी या पहिल्या टप्याचे काम पिंपरीपर्यंत वेगात सुरु आहे. मेट्राेचे खांब उभारण्याचे अाले अाहेत.परंतु, दापोडीच्या पुढे मेट्रोचे काम ठप्प आहे. पिंपरीपर्यंत तयार झालेल्या पिलरचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते  यांनी केला आहे.

कासारवाडी येथील मेट्रोच्या पिलरचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. पिलरच्या सळया बाहेर आल्या आहेत. पिलरमध्ये सिमेंट अर्धवटपणे भरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भविष्यात याचा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. खांबाचे छायाचित्र विरोधी पक्षनेते साने यांनी माध्यमांना दिली. तसेच महामेट्रो नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. तसेच शहरातील आतापर्यंत झालेल्या मेट्रोच्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट मान्यता प्रात्त सरकारी संस्थेकडून करावे, अशी मागणीही त्यांनी केली होती.

त्यानंतर खडबडून जागे झालेल्या महामेट्रोने निकृष्ट कामास जबाबदार असल्याचा ठपका ठेवत दोन अभियंत्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. तसेच या खाबांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी केली जाणार आहे. खांब निकृष्ट आढळल्यास त्याची दुरुस्ती केली जाणार आहे. असे महा मेट्रोचे मुख्य प्रकल्प व्यवस्थापक गौतम बिऱ्हाडे यांनी सांगितले.

Web Title: Mahametro suspended two engineers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.