Maharashtra Assembly Election 2024 Result: पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीचे चारही उमेदवार आघाडीवर; लीड तोडण्याचे आघाडीसमोर तगडे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 11:59 AM2024-11-23T11:59:01+5:302024-11-23T11:59:37+5:30

maharashtra assembly election 2024 result मावळच्या सुनील शेळके हे ९१४८५ मतांनी आघाडीवर असून जिंकण्याच्या मार्गावर तर चिंचवडमधून शंकर जगताप यांच्याकडून भाजपच्या विजयाची पुनर्रावृत्ती होणार?

maharashtra assembly election 2024 result In Pimpri Chinchwad all four candidates of Mahayutti are leading; A tough challenge for the front to break the lead | Maharashtra Assembly Election 2024 Result: पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीचे चारही उमेदवार आघाडीवर; लीड तोडण्याचे आघाडीसमोर तगडे आव्हान

Maharashtra Assembly Election 2024 Result: पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीचे चारही उमेदवार आघाडीवर; लीड तोडण्याचे आघाडीसमोर तगडे आव्हान

पिंपरीचिंचवड : पिंपरीचिंचवडमध्ये पिंपरी, भोसरी, मावळ आणि चिंचवड या विधानसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. पिंपरी विधानससभेत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत होत आहे. भोसरी आणि चिंचवड विधानसभेत भाजप विरुद्ध शरद पवार गट अशी लढत होत आहे. तर मावळची लक्षवेधी निवडणूक शेळके जिंकणार असल्याचे दिसू लागले आहे

मावळ विधानसभेतून २३ वी फेरीअखेर अजित पवार गटाचे सुनील शेळके ९१४८५ मतांनी आघाडीवर आहेत. बापू भेगडे यांना ६३, ५०४ मतं मिळाली आहेत. मोठ्या फरकाने शेळके जिंकतील असे तर्कवितर्क लावले जात आहेत. २०१९ च्या निवडणुकीतही लाखांच्या फरकाने ते विजयी झाले होते. आताही तशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिंपरी विधासभेतून अण्णा बनसोडे यांनी आघाडी घेतली असून बाराव्या फेरी अखेर १२२९८३ मतं त्यांना मिळाली आहेत. तर शरद पवार गटाच्या सुलक्षणा शिलवंत ४२९०१ मतं मिळाली आहेत. बनसोडे सध्या २४७१८ मतांनी आघाडीवर आहेत.  भोसरी विधानसभेतून महेश लांडगे 16856 मतांनी आघाडीवर आहेत. तर शरद पवार गटाचे अजित गव्हाणे 40673 मतं मिळाली आहेत. 

इथं क्लिक करा >>महाराष्ट्र विधानसभा निकाल २०२४ 

चिंचवड विधानसभेतून महायुतीचे शंकर जगताप पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत. त्याठिकाणी तिरंगी लढत होत असून जगताप यांनी  कायम ठेवले आहे. पोटनिवडणुकीतही अश्विनी जगताप या विजयी झाल्या होत्या, आताही चिंचवड मध्ये भाजपच्या विजयाची पुनर्रावृत्ती होण्याची शक्यता आहे. चिंचवडमधून शंकर जगताप 44 हजार 507 मतांनी आघाडीवर आहेत.  

पिंपरी चिंचवडमध्येअजून काही फेऱ्या बाकी राहिल्या आहेत. त्यामध्ये महाविकास आघाडीला सध्याचा लीड तोडण्याचे तागडे आव्हान समोर उभे आहे. मावळ सोडून इतर तीन मतदार संघात आघाडी लीड तोडणार का? याकडे पिंपरी चिंचवडच्या नागरिकांचे लक्ष लागून आहे.  

Web Title: maharashtra assembly election 2024 result In Pimpri Chinchwad all four candidates of Mahayutti are leading; A tough challenge for the front to break the lead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.