Maharashtra Election 2019 : चिंचवडला राहुल कलाटे यांची बंडखोरी कायम ;लढत चुरशीची होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 05:36 PM2019-10-07T17:36:43+5:302019-10-07T17:38:21+5:30

पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभेतील लढत ही चुरशीची होत असते.

Maharashtra Election 2019 : Chinchwad's Rahul Kalate revolts forever; fight will intresting | Maharashtra Election 2019 : चिंचवडला राहुल कलाटे यांची बंडखोरी कायम ;लढत चुरशीची होणार

Maharashtra Election 2019 : चिंचवडला राहुल कलाटे यांची बंडखोरी कायम ;लढत चुरशीची होणार

Next
ठळक मुद्दे पक्षाचा एबी फॉम वेळेत न पोहोचल्याने शितोळे यांचा अर्ज बाद राष्ट्रवादी पुरस्कृत करणार?

पिंपरी : विधानसभा निवडणूकीतील चिंचवड मतदार संघात भाजपाविरोधात शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज भरला होता.  अर्ज माघारीच्या मुदतीत कलाटे यांनी माघार न घेतल्याने चिंचवडची लढत चुरशीची होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभेतील लढत ही चुरशीची होत असते. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीसाठीभाजपाकडून आमदार आणि शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी जाहिर केल्यानंतर राष्ट्रवादीच्या वतीने माजी स्थायी समिती सभापती प्रशांत शितोळे यांना उमेदवारी जाहिर केली होती. तर शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते कलाटे यांनीही अपक्ष अर्ज भरला होता. पक्षाचा एबी फॉम वेळेत न पोहोचल्याने शितोळे यांचा अर्ज बाद झाला होता. चिंचवड विधानसभेतील बंडखोरी रोखण्यासाठी शिवसेनेचे नेते आणि भाजपाचे नेते यांच्याकडून प्रयत्न सुरू होते.  मात्र, कलाटे यांनी माघार न घेण्याची भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे चिंचवडमधील लढत रंगतदार ठरणार आहे.
राष्ट्रवादी पुरस्कृत करणार?
राष्ट्रवादीचा अर्ज बाद झाल्यानंतर चिंचवडमध्ये राष्ट्रवादी कोणती भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे. राहूल कलाटे यांची बंडखोरी कायम राहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस कलाटे यांना पुरस्कृत करणार की नाही याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 : Chinchwad's Rahul Kalate revolts forever; fight will intresting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.