Maharashtra Election 2019 : पिंपरीत महायुती, आघाडीतील बंडखोरांची माघार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 05:45 PM2019-10-07T17:45:46+5:302019-10-07T17:46:19+5:30

शिवसेनेचे अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार व राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांच्या सरळ लढत होणार असल्याचे चित्र..

Maharashtra Election 2019 : Mahayuti and aaghadi rebels withdrawal in the pimpri | Maharashtra Election 2019 : पिंपरीत महायुती, आघाडीतील बंडखोरांची माघार 

Maharashtra Election 2019 : पिंपरीत महायुती, आघाडीतील बंडखोरांची माघार 

Next
ठळक मुद्दे१३ जणांची उमेदवारी मागे, १८ उमेदवारांमध्ये लढत

पिंपरी : राखीव असलेल्या पिंपरी मतदारसंघातील महायुती व आघाडीतील ह्यबंडह्ण थंड झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर ओव्हाळ, नगरसेविका सुलक्षणा धर, नगरसेवक राजू बनसोडे, काँग्रेसचे मनोज कांबळे, सुंदर कांबळे, भाजपाचे अमित गोरखे, भीमा बोबडे, आरपीआयच्या (आठवले गट) चंद्रकांता सोनकांबळे यांच्यासह एकूण १३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. 
उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी महायुती व आघाडीतील इच्छुकांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी उमेदवार बदलला. त्यामुळे या मतदारसंघातील लढतींकडे सर्वांचे लक्ष्य लागून होते. उमेदवारी माघारीनंतर या मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार व राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांच्या सरळ लढत होणार असल्याचे चित्र आहे. 
 राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर ओव्हाळ, नगरसेविका सुलक्षणा धर, नगरसेवक राजू बनसोडे, काँग्रेसचे मनोज कांबळे, सुंदर कांबळे, भाजपाचे अमित गोरखे, भीमा बोबडे, आरपीआयच्या (आठवले गट) चंद्रकांता सोनकांबळे, उत्तम हिरवे, गौरीशंकर झोंबाडे, विजय रंदिल, सतीश भवाल, संदीपान झोंबाडे या उमेदवारांनी माघार घेतली आहे. माघारीनंतर निवडणूक रिंगणात १८ उमेदवार आहेत.

Web Title: Maharashtra Election 2019 : Mahayuti and aaghadi rebels withdrawal in the pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.