महाराष्ट्र निवडणूक २०१९ : मतदानाचा वाढलेला टक्का कोणाच्या पथ्यावर, घटलेला कोणाच्या मुळावर!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 01:34 PM2019-10-23T13:34:41+5:302019-10-23T13:37:33+5:30
Pimpri election 2019 : वाढलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार आणि घटलेला टक्का कोणाच्या मुळावर उठणार याबाबतची चर्चा रंगली आहे.
पिंपरी : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी चोवीस तासांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे कोणत्या मतदारसंघातून कोणाला आघाडी मिळणार? कोण निवडून येणार तर कोणाचा पत्ता कट होणार याबाबतच्या चर्चा रंगल्या आहेत. चिंचवड विधानसभेतील मतदानाचा टक्का २.६५ टक्क्यांनी, भोसरीचा अडीच टक्क््यांनी घसरला आहे. तर मावळ आणि पिंपरीचा टक्का वाढला आहे. वाढलेला टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार आणि घटलेला टक्का कोणाच्या मुळावर उठणार याबाबतची चर्चा रंगली आहे.
विधानसभा निवडणुकीचे मतदान सोमवारी झाले. पिंपरी, चिंचवड, भोसरी, मावळ या चार मतदारसंघातील ४८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. चिंचवडमध्ये ४३९, भोसरीत ४११, पिंपरीत ३९९ आणि मावळमधील ३७० अशा एकूण १६१९ मतदान केंद्रांवर चांगले मतदान झाले. मतदारांचा उत्साह पाहण्याजोगा होता. उच्चशिक्षित आणि नवमतदारही अधिक प्रमाणावर दिसून येत होता. लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांची टक्केवारी काहीशी कमी झाली आहे.
.....
चिंचवडमध्ये ११ उमेदवार रिंगणात होते़ गेल्यावेळी ४ लाख ८२ हजार ३६२ मतदारांनी हक्क बजावला होता. त्यापैकी १ लाख ४८ हजार ७०४ पुरुषांनी तर १ लाख २३ हजार १६३ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ५६.०३ टक्के मतदान झाले होते. तर या वेळी ५ लाख १८ हजार ३०९ मतदारांपैकी २ लाख ७६ हजार २९७ पुरुष तर १ लाख ५३ हजार ९९५ महिला मतदार अशा ५३.३८ टक्के मतदान झाले आहे. म्हणजेच २.६५ टक्के मतदान कमी झाले आहे. भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप विरुद्ध सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार राहुल कलाटे अशी लढत होती. घटलेल्या पावणे तीन टक्के मताचा कोणाला फटका बसणार किंवा फायदा होणार हे गुरुवारी समजेल.
......
भोसरीत घटले अडीच टक्के मतदानभोसरी विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी भाजपाचे आमदार महेश लांडगे आणि माजी आमदार विलास लांडे अशी लढत आहे. गेल्यावेळी ३ लाख ६३ हजार ५५३ मतदारांनी हक्क बजावला होता. त्यापैकी १ लाख २४ हजार १६२ पुरुषांनी तर ९६ हजार ७८६ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ६०.९२ टक्के मतदान झाले होते. तर या वेळी ४ लाख ४१ हजार १२५ मतदारांपैकी १ लाख ४५ हजार १८१ पुरुष तर १ लाख १३ हजार ५३५ महिला मतदार अशा ५८.६५ टक्के मतदान झाले आहे. म्हणजेच २.२७ टक्के मतदान कमी झाले आहे. कमी मताचा फटका कोणास बसणार याबाबत चर्चा आहे.
......
पिंपरीमध्ये उच्च शिक्षितांच्या कौलाकडे लक्ष
पिंपरी विधानसभेत एकूण १८ उमेदवार रिंगणात होते. पिंपरीत आमदार गौतम चाबुकस्वार विरुद्ध राष्टÑवादीचे माजी आमदार अण्णा बनसोडे अशी लढत होती. गेल्यावेळी ३ लाख ८२ हजार ७१८ मतदारांनी हक्क बजावला होता. त्यापैकी ९७ हजार ५८४ पुरुषांनी तर ७९ हजार ०८३ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ४६.२३ टक्के मतदान झाले होते. तर या वेळी ३ लाख ५३ हजार ५४५ मतदारांपैकी ९७ हजार ०८३ पुरुष तर ८० हजार ३०१ महिला मतदार अशा ५०.१७ टक्के मतदान झाले आहे. म्हणजेच ३.९४ टक्के मतदान वाढले आहे. वाढीव टक्क्यांचा कोणास फायदा होणार? याबाबत उत्सुकता आहे.
मावळ विधानसभेमध्ये होणार चुरस
४मावळ विधानसभा मतदारसंघात ७ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी भाजपाकडून राज्यमंत्री बाळा भेगडे, राष्टÑवादीकडून सुनील शेळके अशी लढत आहे. गेल्यावेळी २ लाख ९२ हजार ८९८ मतदारांनी हक्क बजावला होता. त्यापैकी १ लाख १२ हजार ९१२ पुरुषांनी तर ९५ हजार १४५ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ७१.०२ टक्के मतदान झाले होते. तर यावेळी ३ लाख ४८ हजार ४६२ मतदारांपैकी १ लाख ३१ हजार ४०६ पुरुष तर १ लाख १६ हजार ५५४ महिला मतदार अशा ७१.०९ टक्के मतदान झाले आहे. म्हणजेच ०.०२ टक्के मतदान कमी झाले आहे.
........
२०१४ टक्केवारी
पुरुष महिला टक्केवारी
चिंचवड १,४८,७०४ १,२३,१६३ ५६.०३
पिंपरी ९७,५८४ ७९,०८३ ४६.२३
भोसरी १,२४,१६२ ९६,७८६ ६०.९२
मावळ १,१२,९१२ ९५,१८३ ७१.०२
..........
२०१९ टक्केवारी
पुरुष महिला टक्केवारी वाढ/घट
चिंचवड १,५३,९५५ १,२२,७१२ ५३.३८ २.६५ घट
पिंपरी ९७,०८३ ८०,३०१ ५०.१७ ३.९४ वाढ
भोसरी १,४५,१८१ १,१३५३५ ५८.६५ २.२७ घट
मावळ १,३१,४०६ १,१६,५५४ ७१.१६ ०.१४ वाढ.
.........