महाराष्ट्र केसरीसाठी नखाते, तुपे, शहर निवड चाचणी कुस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 03:46 AM2017-11-28T03:46:50+5:302017-11-28T03:47:05+5:30

राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या महाराष्टÑ केसरी गटासाठी पिंपरी-चिंचवडमधून गादी विभागातून किशोर नखाते आणि वैभव तुपे याची निवड झाली.

 Maharashtra Kesari for Nakhate, Tupe, City Wrestling Test | महाराष्ट्र केसरीसाठी नखाते, तुपे, शहर निवड चाचणी कुस्ती

महाराष्ट्र केसरीसाठी नखाते, तुपे, शहर निवड चाचणी कुस्ती

Next

रहाटणी : राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या महाराष्टÑ केसरी गटासाठी पिंपरी-चिंचवडमधून गादी विभागातून किशोर नखाते आणि वैभव तुपे याची निवड झाली.
राज्य कुस्ती स्पर्धेसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील पैलवानांची निवड चाचणी स्पर्धा रविवारी झाली. कुमार आणि खुल्या गटात माती व गादी विभागात स्पर्धा झाली. स्पर्धा पाहण्यासाठी शहर आणि परिसरातील कुस्ती शौकीनांनी गर्दी केली होती.
महाराष्ट्र केसरी गटात (८६ ते १२५ किलो) गादी विभागात रहाटणीच्या किशोर नखाते याने भोसरीतील हर्षवर्धन मानेवर १२-२ असा भारंदाज डावावर तांत्रिक गुणांनी विजय मिळविला.
महाराष्ट्र केसरी गट माती विभागात रहाटणीच्या वैभव तुपे याने पिंपळे सौदागरच्या कानिफनाथ काटेला बांगडी डावावर चितपट केले. नखाते हा या वर्षीचा महाराष्ट्र युवा केसरी असून, पुण्यातील सह्याद्री कुस्ती संकुलात सराव करीत आहे. तुपे हा एचए तालीम येथे सराव करीत आहे.
राज्य कुस्ती स्पर्धा दि. २० ते २४ डिसेंबरदरम्यान भुगाव (ता. मुळशी) येथे होणार आहे. त्यानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरातील कुस्तीपटूंसाठी पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघ व नाना काटे सोशल फाउंडेशन यांच्या
वतीने कै. पंढरीनाथ फेंगसे
यांचे स्मरणार्थ पिंपळे सौदागर पोलीस चौकी शेजारी कै. देवराम काटे
पाटील क्रीडानगरीत रविवारी
निवड चाचणी कुस्ती स्पर्धा
झाल्या.
नखाते विरुद्ध माने यांची गादी विभागातील महाराष्ट्र केसरी खुला गटातील अंतिम सामना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लावण्यात आला.
महाराष्ट्रातील जनतेचे कुस्तीवर मनापासून प्रेम आहे. मुलांमध्ये क्रीडानैपुण्य वाढीस लागावे म्हणून वस्ताद परिश्रम घेतात. त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी
आघाडी सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी,
भारत केसरी, रुस्तम-ए-हिंद या मल्लांना मासिक मानधनाची योजना सुरू केली.
महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेचा अध्यक्ष या नात्याने मी महाराष्ट्राच्या कुस्तीचा जगभर नाव लौकिक वाढावा म्हणून काम करीत आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
या वेळी खासदार श्रीरंग बारणे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, संयोजक व नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते
शंकर काटे, आॅलिम्पिक वीर
मारुती आडकर, अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष विजय बराटे, महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड, महान महाराष्ट्र केसरी दिलीप भरणे, भारत केसरी विजय गावडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, संघाचे उपाध्यक्ष काळुराम कवीतके,
संतोष माचुत्रे, दिलीप बालवडकर, पोपट फुगे, पंडित मोकाशी, राजू जाधव, हिंद केसरी अमोल बराटे,
पंच धोंडिबा लांडगे, मारुती सातव, नवनाथ ढमाळ, मनोज दगडे,
विजय कुटे, विजय नखाते, निवेदक हंगेश्वर धायगुडे, सुनील कुंजीर, मच्छिंद्र काटे, प्रशांत शितोळे, अतुल शितोळे, प्रभाकर वाघेरे, मच्छिंद्र तापकीर, कैलास थोपटे आदी उपस्थित होते.

कुमार गट : शुभम दळवी, अक्षय कर्पे, यश कलाटे विजेते

गटवार विजेते,उपविजेते : कुमार गट : ४५ किलो : प्रणव सस्ते (मोशी), अनिल गायकवाड (भोसरी), ४८ किलो : विशाल सोंडकर (भोसरी), केदार लांडगे (भोसरी), ५१ किलो : ओंकार जाधव (थेरगाव), ओंकार पिसाळ ( सांगवी), ५५ किलो : समर्थ गायकवाड (निगडी), निरंजन बालवडकर (पिंपळे निलख), ६० किलो: सिद्धांत लांडे (कासारवाडी), यश थोरवे (चºहोली), ६५ किलो : शुभम चिंचवडे (चिंचवड), तेजस फेंगसे (ताथवडे), ७१ किलो : देवांग चिंचवडे (चिंचवड), सुरज देवकर (सांगवी), ८० किलो : शुभम दळवी (भोसरी), प्रतिक चिंचवडे (चिंचवडे), ९२ किलो : अक्षय कर्पे (चिखली), पवन माने (रहाटणी), ११० किलो : यश कलाटे (वाकड), राज बारणे.
गादी विभाग : ५७ किलो : योगेश तापकीर (चºहोली), कुणाल जाधव, ६१ किलो : राजू हिप्परकर (रहाटणी), पुरशुनाथ कॅम्प (चिंचवड), ६५ किलो : संदेश काकडे (भोसरी), अनिकेत ढोरे (सांगवी), ७० किलो : शेखर शिंदे (पिंपळे गुरव), रविंद्र गोरड (पिंपरी), ७४ किलो : अक्षय यादव ( चिखली), शिवराज मदने (मोशी), ७९ किलो : विवेक शेलार (थेरगाव), गणेश साळुंखे (मोशी), ८६ किलो : प्रसाद सत्ते (मोशी), ९२ किलो : अजिंक्य कुदळे (पिंपरी), सुशांत फेंगसे ( (फुगेवाडी), ९७ किलो : प्रमोद मांडेकर (भोसरी), केतन खराडे (एचए तालिम), महाराष्टÑ केसरी गट ( ८६ ते १२५ किलो) : किशोर नखाते (रहाटणी), हर्षवर्धन माने (भोसरी).

माती विभाग : ५७ किलो : आकाश काळभोर (आकुर्डी), धीरज बोराडे (चिंचवड) , ६१ किलो : अविनाश माने (आकुर्डी ), विनायक नाईक , ६५ किलो : शेखर लोखंडे (पिंपळे गुरव ), पृथ्वी भोईर (चिंचवड ), ७० किलो : पवन माने (आकुर्डी), निखिल पिंगळे (चिखली), ७४ किलो : संतोष नखाते (रहाटणी), अक्षय आडाळे (पिंपरी),७९ किलो : स्वामी देवकर (पिंपळे गुरव), सुरज नखाते (रहाटणी), ८६ किलो : निखिल नलावडे (चिंचवड), विपुल वाळुंज (वाल्हेकरवाडी),९२ किलो :अशोकभोंगळे(चिंचवड), चेतन घुले (बोपखेल), ९७ किलो : अनिकेत काशिद (सांगवी), आदेश नाणेकर (पिंपरी), महाराष्टÑ केसरी गट ( ८६ ते १२५ किलो) : वैभव तुपे (रहाटणी), कानिफनाथ काटे (पिंपळे सौदागर).

Web Title:  Maharashtra Kesari for Nakhate, Tupe, City Wrestling Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे