‘महावितरण’ला ठोकले टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 02:00 AM2018-08-27T02:00:54+5:302018-08-27T02:01:29+5:30
ताथवडे : उद्धट वागणूक मिळत असल्याचा निषेध
वाकड : ताथवडे येथील महावितरण उपविभागीय कार्यालयाला रविवारी सकाळी विद्युत वितरण सनियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी टाळे ठोकले. कार्यालयाचे कामकाज बंद पाडले. विद्युत वितरणच्या अधिकाºयांनी नागरिकांशी तसेच समितीच्या पदाधिकाºयांना योग्य वागणूक द्यावी, अशी सूचना त्यांना देण्यात आली. पोलिसांनी धाव घेतल्यानंतर तब्बल तीन तासांनी टाळे उघडून कार्यालयाचे कामकाज पूर्ववत केले.
विद्युत महावितरण सनियंत्रण समितीचे अध्यक्ष संजय मरकड, सदस्या भारती विनोदे, मधुकर बच्चे, देविदास शिंदे, संकेत मरकड, तेजस चौरे, युवराज शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. नागरिकांना महावितरण कार्यालयाकडून उद्धट वागणूक मिळते. नागरिकांच्या समस्यांची दखल घेतली जात नाही, अशा तक्रारी येऊ लागल्याने सदस्यांनी महावितरण कार्यालय गाठून संताप व्यक्त केला. कर्मचाºयांना बाहेर काढून कार्यालयास टाळे ठोकले.
कार्यालयाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. मनुष्यबळाच्या तुलनेने परिसर खूप मोठा आहे. त्यामुळे अनेकदा नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी वेळेत कर्मचारी पोहोचू शकत नाही. मनुष्यबळ कमी असले, तरी नागरिकांच्या तक्रारी वेळेत दूर करण्याचा प्रयत्न असतो. रविवारी सकाळी थेरगाव येथून तक्रार आली, नेमका पत्ता मिळाला नसल्याने कर्मचारी तेथे पोहोचू शकला नाही. - प्रकाश नाईकवडे, सहायक अभियंता,
ताथवडे उपविभागीय कार्यालय महावितरण