Pimpri Chinchwad | महावितरणचा दणका! आकुर्डीमध्ये चौदाशे वीजचोऱ्या उघड

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: March 17, 2023 02:35 PM2023-03-17T14:35:59+5:302023-03-17T14:37:12+5:30

या परिसरात वीजचोऱ्या होणार नाही यासाठी येत्या १५ दिवसांमध्ये एरीयल बंच केबल लावण्यात येणार...

Mahavitran action in pcmc area 1400 electricity thefts revealed in Akurdi | Pimpri Chinchwad | महावितरणचा दणका! आकुर्डीमध्ये चौदाशे वीजचोऱ्या उघड

Pimpri Chinchwad | महावितरणचा दणका! आकुर्डीमध्ये चौदाशे वीजचोऱ्या उघड

googlenewsNext

पिंपरी :आकुर्डीमध्ये चिंचवड स्टेशनजवळील आनंदनगरमध्ये महावितरणने बुधवारी व गुरुवारी (दि. १५ व १६) धडक मोहीम राबवून सुमारे १४०० घरगुती वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत. या मोहिमेत थेट तारांवर टाकलेले आकडेही जप्त करण्यात आले. तसेच या परिसरात वीजचोऱ्या होणार नाही यासाठी येत्या १५ दिवसांमध्ये एरीयल बंच केबल लावण्यात येणार आहे.

भोसरी विभागातील चिंचवड शाखेअंतर्गत आनंदनगर हा परिसर येतो. या ठिकाणी ३१५ केव्हीए क्षमतेचे रोहित्र नादुरुस्त झाले होते. त्याची पाहणी करताना आकडे टाकून वीजचोऱ्या होत असल्याने अतिभारित झालेले रोहीत्र नादुरुस्त झाल्याचे आढळून आले होते. महावितरणकडून लगेचच कारवाई करीत सर्व आकडे काढून टाकण्यात आले. त्यानंतर दहा दिवसांपूर्वी आनंदनगरमध्ये नवीन रोहीत्र बसविण्यात आले ते दोन दिवसांनी पुन्हा नादुरुस्त झाले.

चिंचवड शाखेच्या सहायक अभियंता कृतिका भोसले तसेच आकुर्डी उपविभाग कार्यालयाचे सहायक अभियंता शितल किनकर व अमित पाटील यांच्यासह १५ महावितरण कर्मचाऱ्यांनी बुधवारी (दि. १५) सकाळी १० वाजता आनंदनगरमध्ये वीजचोरीविरोधी पुन्हा विशेष मोहीम सुरु केली. त्यास विरोध करणाऱ्या नागरिकांना वीजचोरीचे परिणाम समजून सांगण्यात आले व अधिकृत वीजजोडणी घेण्याचे आवाहन करण्यात आले. गुरुवारी (दि. १६) या मोहिमेला सकाळी ११ च्या सुमारास विरोध वाढल्यामुळे पोलिसांचे सहकार्य घेण्यात आले. या दोन दिवसीय कारवाईमध्ये थेट आकडे टाकून तसेच इतर मार्गाने सुरु असलेल्या सुमारे १४०० घरगुती वीजचोऱ्या उघड करण्यात आल्या व वीजचोरीसाठी वापरलेले सर्व साहित्य जप्त करण्यात आले.

या मोहिमे दरम्यान महावितरणकडून वीजमीटर काढून कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही वीजचोरी होत असल्याचे दिसून आले. तसेच काहींनी थेट आकडे टाकून वीजचोरी केल्याचे आढळून आले. या सर्वांना अधिकृत नवीन घरगुती वीजजोडणी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नवीन वीजजोडणी घेण्यासाठी आतापर्यंत थकबाकीपोटी सुमारे ६० हजार रुपयांचा भरणा करण्यात आला आहे. तसेच नवीन वीजजोडणीची मागणीही वाढली आहे.

Web Title: Mahavitran action in pcmc area 1400 electricity thefts revealed in Akurdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.