पिंपरी चिंचवड महापालिकेच्या २३ प्रभागांत महिलाराज; आरक्षण सोडतीनंतरचे चित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 12:25 PM2022-07-30T12:25:41+5:302022-07-30T12:27:38+5:30

४६ प्रभाग असून, १३९ नगरसेवक असणार आहेत...

Mahilaraj in 23 wards of Pimpri Chinchwad Municipal Corporation; | पिंपरी चिंचवड महापालिकेच्या २३ प्रभागांत महिलाराज; आरक्षण सोडतीनंतरचे चित्र

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या २३ प्रभागांत महिलाराज; आरक्षण सोडतीनंतरचे चित्र

Next

पिंपरी : महापालिका १३९ जागांसाठी निवडणूक होणार असून, आरक्षण सोडतीनंतर एका प्रभागातील तीनपैकी सुमारे २३ प्रभागांत दोन महिला उमेदवार येणार आहेत. त्यामुळे तेवीस प्रभागांत महिला राज असणार आहे. त्यामुळे पुरुष इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. त्यांना कुटुंबातील इतर सदस्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरावे लागणार आहे. तसेच महापालिकेतील एकूण जागांपैकी एक महिला येणाऱ्या सभागृहात अधिक असणार आहे.

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक तीनसदस्यीय पद्धतीने होणार आहे. ४६ प्रभाग असून, १३९ नगरसेवक असणार आहेत. यामध्ये ७० महिला आणि ६९ पुरुषांसाठी जागा राखीव आहेत. त्यात अनुसूचित जाती (एससी) ११ पुरुष ११ महिला अशा २२, अनुसूचित जमाती (एसटी) २ महिला १ पुरुष अशा ३, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी१) १९ महिला, १८ पुरुष अशा ३७ आणि खुल्या गटासाठी ३८ महिला ३९ पुरुष ७७ अशी वर्गवारी आहे.

हे आहेत दोन महिला आरक्षणाचे प्रभाग

महापालिका प्रभाग ४ : मोशी गावठाण, डुडुळगाव, गंधर्वनगरी (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला), प्रभाग ७ : सँण्डविक कॉलनी, रामनगर (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला), प्रभाग ८ : भोसरी गावठाण, गवळीनगर, शितलबाग (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला), प्रभाग ९ : धावडेवस्ती, चक्रपाणी वसाहत (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला), प्रभाग १० : इंद्रायणीनगर, लांडेवाडी, शांतिनगर, गव्हाणेवस्ती (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला), प्रभाग १२ : घरकुल, नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला), प्रभाग १३ : मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला), प्रभाग १४ : यमुनानगर, फुलेनगर (एससी महिला, सर्वसाधारण महिला), प्रभाग १५ : संभाजीनगर, पूर्णानगर, शाहूनगर (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला), प्रभाग १७ : वल्लभनगर (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला), प्रभाग १९ : चिंचवड स्टेशन, मोहननगर, इंदिरानगर, आनंदनगर (एससी महिला, सर्वसाधारण महिला), प्रभाग २० : काळभोरनगर, विद्यानगर, रामनगर, दत्तनगर, अजंठानगर (एससी महिला, सर्वसाधारण महिला).

Web Title: Mahilaraj in 23 wards of Pimpri Chinchwad Municipal Corporation;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.