व्यसनांबाबत जनजागृती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:27 AM2018-08-28T00:27:44+5:302018-08-28T00:28:24+5:30
विकास चोधे : आकुर्डीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
रावेत : विद्यार्थ्यांनी व्यसनाच्या आहारी न जाता आपल्या आजुबाजूला असणाऱ्या लोकांना आपल्या मित्र-मैत्रिणींना व्यसनापासून दूर राहण्यासाठी मदत करावी. व्यसनांमुळे होणारे दुष्परिणाम जाणून घ्या. समाजाला त्याबाबत माहिती देऊन व्यापक जनजागृती करण्याची गरज आहे, असे मत डॉ. विकास चोधे यांनी व्यक्त केले.
आकुर्डी येथील प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने चिंचवड येथील डॉन बॉस्को सोसायटीच्या सहकार्याने डॉ. चोधे यांचे ‘व्यसनमुक्ती’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. सोसायटीच्या समन्वयक ललिता चौधरी, विभावरी कांबळे, राजश्री देशखिरे, सारिका कदम, अर्जुन शरणागते, उपप्राचार्य डॉ. नीलेश दांगट आदी या वेळी उपस्थित होते.
महाविद्यालयामध्ये व्यसनमुक्तीवर पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. रविराज काळे, सोमेश्वर कारळे, विद्या धुरटे या विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिकबंदी, व्यसनमुक्ती या विषयावरील पथनाट्य सादर केले. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. प्राचार्य डॉ. मनोहर चासकर यांनी मार्गदर्शन केले. डॉ. सविता कुलकर्णी, डॉ. सारिका मोहोळ यांनी नियोजन केले. मनोज गुंजाळ, रविराज काळे, विजय बनसोडे या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. डॉ. दांगट यांनी प्रास्ताविक केले. डॉ. सविता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सारिका मोहोळ यांनी आभार मानले.
काही वेळा लहानपणापासून दारू, तंबाखूची सवय लागते. अशा वेळी व्यसनापासून दूर राहणे अवघड असते. आई-वडिलांनी पाल्याकडे लक्ष द्यावे. अनेकदा मित्रांमुळे आपल्याला अशा सवयी लागतात. तेव्हा अशा मित्रांची संगत सोडावी. सिगरेट पिणाºया व्यक्तीच्या शरीरात ३० टक्के धूर जातो. उर्वरित धूर आजुबाजूला असणाºया लोकांना त्रासदायक असतो. व्यसनाधीनतेमुळे मानसिक असंतुलन, नैराश्य, आत्महत्या घडतात. आपल्या हातून काय घडते आहे याचा अंदाज व्यसनाधीन माणसाला नसतो. विद्यार्थ्यांनी आपल्या आजुबाजूला व्यसन करणारी व्यक्ती असल्यास तिला त्याचे दुष्परिणाम सांगावेत, असे आवाहन डॉ. चोधे यांनी केले.