जरांगे - पाटलांच्या उपोषणाला पिंपरीत पाठिंबा; दोन दिवसात आंदोलन तीव्र करणार

By विश्वास मोरे | Published: October 29, 2023 05:32 PM2023-10-29T17:32:31+5:302023-10-29T17:33:13+5:30

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने गेल्या पाच दिवसापासून साखळी उपोषण सुरू

manoj jarange patil hunger strike support in Pimpri The agitation will intensify in two days | जरांगे - पाटलांच्या उपोषणाला पिंपरीत पाठिंबा; दोन दिवसात आंदोलन तीव्र करणार

जरांगे - पाटलांच्या उपोषणाला पिंपरीत पाठिंबा; दोन दिवसात आंदोलन तीव्र करणार

पिंपरी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे गेल्या पाच दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत.  या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने गेल्या पाच दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे. आज पाचव्या दिवशी दोन दिवसात आंदोलन तीव्र करणार असल्याचे सांगण्यात आले. 

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणस्थळी आज दिवसभर विविध नेते आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी भाषणे करून उत्साह निर्माण वाढविला. 

यांनी दिला पाठिंबा 

उपोषणासाठी कामगार संघटना,  राजमाता जिजाऊ ज्येष्ठ नागरिक संघ, महाविकास समिती,  वीर भगतसिंह विद्यार्थी परिषद,  बहुजन मुक्ती मोर्चा, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महार वतन संघर्ष समिती महाराष्ट्र ,मातोश्री प्रतिष्ठान प्राधिकरण, गडसोसायटी रावेत इत्यादी विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते. पाचव्या दिवशी सतीश काळे, वैभव जाधव नकुल भोईर,संतोष शिंदे,गणेश आहेर,रावसाहेब गंगाधरे,निलेश बदाले,प्रशांत जाधव,मयूर पवार,सुलभा यादव, तेजस पवार यांच्यासह तीस मराठा बांधव भगिनींनी उपोषण केले.

सरकारनेमराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी चाळीस दिवसाची वेळ घेतली होती. परंतु आज ४५ दिवस झाले तरी आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही.  गेल्या पाच दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू आहे, त्यांची प्रकृती खालावली आहे. जर त्यांच्या आरोग्यास काही झाले तर मराठा समाज गप्प बसणार नाही आणि सरकारला हे आंदोलन परवडणार नाही, संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्रेक होईल तेव्हा सरकारने आता मराठा समाजाचा अंत पाहू नये, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोणत्या पक्षाचे आहेत, कोणत्या समाजाचे आहेत, याचा विचार मराठा समाज करणार नाही, त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल, दोन दिवसात आंदोलन तीव्र करणार, असा इशारा पिंपरी चिंचवड शहर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज देण्यात आला.

Web Title: manoj jarange patil hunger strike support in Pimpri The agitation will intensify in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.