Maratha Reservation: आंदोलकांना न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 03:39 AM2018-08-04T03:39:00+5:302018-08-04T03:39:12+5:30

Maratha Reservation: Judicial custody of protesters | Maratha Reservation: आंदोलकांना न्यायालयीन कोठडी

Maratha Reservation: आंदोलकांना न्यायालयीन कोठडी

Next

रावेत : मराठा आरक्षणासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीवरून उड्या घेत आत्मबलिदान करण्याचा इशारा मराठी मोर्चाच्या दहा कार्यकर्त्यांकडून दिला होता. त्यामुळे गुरुवारी रात्री ११ वाजता या नऊ आंदोलकांना राहटणी येथून अटक केली. १० आॅगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.
सतीश काळे यांच्यासह छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व मोर्चाचे समन्वयक धनाजी येळकर-पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र देवकर पाटील, वैभव जाधव, अमोल मानकर, भय्यासाहेब गजधने, ज्ञानदेव लोभे, राजू पवार आणि अंतिम जाधव अशी सामूहिक आत्मबलिदानाचा इशारा देणाऱ्या आंदोलकांची नावे आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये या आंदोलकांनी अन्नत्याग केला आहे. आंदोलनकर्त्यांना अटक करून शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर केले होते. १० आॅगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.

- मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी आणि आंदोलनासाठी आपले प्राण गमविलेल्या समाज बांधवांना प्रत्येकी ५० लाख रुपये आर्थिक मदत व कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरूपी सरकारी नोकरी द्यावी या मागणीकरिता शनिवारी सामूहिक आत्महत्या करणार असल्याचा इशारा मोर्चाचे समन्वयक सतीश काळे व त्यांच्या नऊ सहकाºयांनी दिलेला होता.

Web Title: Maratha Reservation: Judicial custody of protesters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.