शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत शहर राष्ट्रवादी काँगेसचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 20:28 IST2019-06-18T20:26:11+5:302019-06-18T20:28:23+5:30
साने यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्यातील तपासाबाबत पोलीस निष्काळजीपणा करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत शहर राष्ट्रवादी काँगेसचा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा
चिंचवड: पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्यातील मुख्य सुत्रधारास अटक करावी,साने यांना संरक्षणं द्यावे व शहरातील वाढती गुन्हेगारी थांबवावी या साठी आज दुपारी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पोलीस यंत्रणेचा निषेध करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला.
या प्रसंगी भोसरी विधान सभेचे माजी आमदार विलास लांडे,शहराध्यक्ष संजोग वाघेरे,महिला शहराध्यक्ष वैशाली काळभोर,दत्ता साने,प्रशांत शितोळे यांच्या सह राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त करत घोषणाबाजी केली. आयुक्तालयाच्या मुख्य प्रवेश द्वारावर ठिय्या आंदोलन केले.शहरात वाढत असलेली गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना अपयश येत आहे.साने यांच्या कार्यालयावर झालेल्या हल्यातील तपासाबाबत पोलीस निष्काळजीपणा करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.हल्ल्यातील मुख्य सुत्रधारास अटक करावी अशी मागणी या वेळी करण्यात आली.शहरात लहान मुलींवरील अत्याचार वाढत आहेत. या बाबत पोलिसांनी योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने करण्यात आली.