बनावट कागदपत्रांच्या आधारे विवाह; पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
By नारायण बडगुजर | Updated: January 12, 2025 17:41 IST2025-01-12T17:40:45+5:302025-01-12T17:41:14+5:30
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित ज्ञानेश्वर याने त्याच्या जन्मतारखेची कागदपत्रे बनावट तयार

बनावट कागदपत्रांच्या आधारे विवाह; पाच जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल
पिंपरी : मुलाचे वय २१ वर्ष पूर्ण नसताना बनावट कागदपत्रांच्या आधारे मुलाचे वय २१ वर्ष पूर्ण असल्याचे दाखवून तरुणीसोबत विवाह केला. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी मुलगा आणि त्याच्या नातेवाईकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ही घटना २२ ऑक्टोबर रोजी दुपारी जगद्गुरू मंगल कार्यालय, आळंदी येथे घडली.
गोपीनाथ माधवराव जाधव (४६, रा. परभणी) यांनी याप्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ज्ञानेश्वर तुकाराम सुरनर (१९, रा. परभणी), विवेक सुरेश पोकळे, संदीप ठक्कर राहांगडाले, राजेभाऊ रामभाऊ देवकाते, गणेश रामभाऊ देवकाते आणि इतर लोकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित ज्ञानेश्वर याने त्याच्या जन्मतारखेची कागदपत्रे बनावट तयार करून त्यावर त्याचे वय २१ पूर्ण असल्याचे दाखवले. त्यानुसार फिर्यादी यांच्या मुलीसोबत त्याने बेकायदेशीरपणे विवाह केला. यामध्ये मुलगा ज्ञानेश्वर आणि त्याच्या नातेवाईकांनी फिर्यादी जाधव यांची फसवणूक केली.