प्रेमसंबंधातून लग्नाचा तगादा; सात लाखांची सुपारी देऊन महिलेची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 05:06 PM2022-08-26T17:06:30+5:302022-08-26T17:06:43+5:30

तळेगाव दाभाडे येेथे मागील १५ दिवसांपुर्वी महिलेची हत्या झाली होती

Marriage conflict from love affair; Killing a woman by paying seven lakh betel nuts | प्रेमसंबंधातून लग्नाचा तगादा; सात लाखांची सुपारी देऊन महिलेची हत्या

प्रेमसंबंधातून लग्नाचा तगादा; सात लाखांची सुपारी देऊन महिलेची हत्या

googlenewsNext

पिंपरी : तळेगाव दाभाडे येेथे मागील १५ दिवसांपुर्वी महिलेची हत्या झाली होती. या हत्येचा उलगडा करण्यात गुन्हे शाखा युनिट ५ ला यश आले आहे. अनैतिक संबंधातून ही हत्या झाली. महिलने लग्नाचा तगादा लावल्याने आरोपीने हत्येची सुपारी दिली होती, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपी बजरंग मुरली तापडे (वय ४५, रा. तळेगाव दाभाडे), पांडुरंग उर्फे सागर बन्सी हारके (वय ३५, रा. मोशी), सचिन प्रभाकर थिगळे (वय ३०, रा. बुलढाणा), सदानंद रामदास तुपकर (वय २६, रा.बुलढाणा) यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या महिलेचे आरोपी बजरंग तापडे याच्याशी प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून तिने बजरंग याच्याकडे लग्नाचा तगादा लावला होता. मात्र, बजरंग आधीच विवाहित होता. त्याला तीन मुले देखील आहेत. त्यामुळे त्याने महिलेच्या हत्येची सात लाख रुपयांची सुपारी आरोपी पांडुरंग हारके याला देत त्याला रोख चार लाख रुपये दिले. आरोपी पांडुरंग हारके याने आरोपी सचिन थिगळे याला एक लाख रुपये रोख देत महिलेचा फोटो दाखवून तिचा येण्या जाण्याचा मार्ग दाखवला. आरोपी सचिन आणि त्याचा मित्र सदानंद यांनी महिलेच्या घराची रेकी केली. ९ ऑगस्टला महिला स्कुटीवरून जात असताना आरोपी सचिन आणि सदानंद यांनी चारचाकी गाडी येत दिला अडवले. आरोपींनी तिचे केस पकडून धारधार चाकूने तिचा गळा चिरून खून करून पळ काढला. पोलिसांनी तळेगाव दाभाडे ते चिंबळी असा ६० ते ६५ किलोमीटर परिसरात माग काढला. आरोपी राहत असलेल्या ठिकाणी आजुबाजुला चौकशी करून तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांना जेरबंद केले.

Web Title: Marriage conflict from love affair; Killing a woman by paying seven lakh betel nuts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.