विवाहितेची आत्महत्या

By admin | Published: January 24, 2017 02:18 AM2017-01-24T02:18:19+5:302017-01-24T02:18:19+5:30

विवाहित महिलेने राहत्या घरात लोखंडी हुकाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी

Marriage Suicide | विवाहितेची आत्महत्या

विवाहितेची आत्महत्या

Next

पिंपरी : विवाहित महिलेने राहत्या घरात लोखंडी हुकाला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सोमवारी सकाळी आठच्या सुमारास थेरगाव येथील साईनाथनगर येथे उघडकीस आला. उषा सतीश अहिरे (वय ३०, रा. साईनाथनगर, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
उषा गृहिणी होत्या. त्यांचे पती सतीश गवंडी काम करतात. गेल्या १२ वर्षांपासून ते पुण्यात राहत होते. तीन महिन्यांपूर्वी थेरगाव येथे वास्तव्यास आले होते. उषा यांनी राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास
घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. वाकड पोलीस तपास करत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Marriage Suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.