पुणे: सुसगावमध्ये पहिल्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2022 15:40 IST2022-07-30T15:37:31+5:302022-07-30T15:40:02+5:30
साससरच्यांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल...

पुणे: सुसगावमध्ये पहिल्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेची आत्महत्या
पिंपरी : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी साससरच्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मुळशी तालुक्यातील सुसगाव येथे गुरुवारी (दि. २८) सकाळी ही घटना घडली.
कोंडीबा मच्छिन्द्र थोरे (वय ५०, रा. कमालपूर, ता. औसा, जि. लातूर) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती प्रकाश दादाराव गायकवाड, सासरे दादाराव गायकवाड, दीर गणेश दादाराव गायकवाड आणि तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या २५ वर्षीय मुलीचा आरोपींनी छळ केला. लग्नात ठरल्या प्रमाणे घर बांधकामासाठी एक लाख रुपये वडिलांकडून आणले नाहीत, या कारणावरून सतत शारीरिक व मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून फिर्यादीच्या मुलीने सासरच्या राहत्या घरी पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली, असे फिर्यादीत नमूद आहे.