मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ, भोसरीत ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2021 08:18 PM2021-05-24T20:18:31+5:302021-05-24T20:19:10+5:30

चारित्र्यावर संशय घेत तसेच फिर्यादीला मुलगी झाली म्हणून विवाहितेचा क्रूर पद्धतीने छळ...

Married women harassment due to born daughter, case filed against five persons | मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ, भोसरीत ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

मुलगी झाल्याने विवाहितेचा छळ, भोसरीत ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

Next

पिंपरी : मुलगी झाल्याने तसेच पैशाच्या कारणावरून विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी भोसरी येथे २६ एप्रिल २०१६ ते ५ जानेवारी २०२१ या कालावधीत ही घटना घडली.

नीलेश विठ्ठल नलावडे (वय ३२), विठ्ठल हरिभाऊ नलावडे (वय ५५), कविता विठ्ठल नलावडे (वय ५०, तिघेही रा. मिनी मार्केट समोर, एमआयडीसी भोसरी), गोरख शेलार (वय ४०), शितल गोरख शेलार (वय ३६, दोघेही रा. कोंढवा, पुणे), अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित विवाहितेने रविवारी (दि. २३) याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून फिर्यादीचा छळ केला. चारित्र्यावर संशय घेत तसेच फिर्यादीला मुलगी झाली म्हणून तसेच माहेराहून पैसे आणण्याची वारंवार मागणी करून त्यासाठी फिर्यादीला क्रूर वागणूक दिली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजश्री पावरा तपास करीत आहेत.

Web Title: Married women harassment due to born daughter, case filed against five persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.