हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग; दरवाजा लॉक झाल्याने ४ जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 16:36 IST2025-03-19T16:36:04+5:302025-03-19T16:36:41+5:30

चालक आणि समोरील कर्मचारी तातडीने बाहेर पडले. मात्र, मागील दरवाजा उघडता न आल्याने मागच्या सीटवर बसलेल्या ४ कर्मचाऱ्यांना बाहेर पडता आले नाही

Massive fire breaks out at Tempo Travels in Hinjewadi; 4 people die as door is locked, what exactly happened? | हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग; दरवाजा लॉक झाल्याने ४ जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग; दरवाजा लॉक झाल्याने ४ जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

हिंजवडी : आयटीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला अचानक आग लागली. यामध्ये, चार जणांचा होरपळून मृत्यू झाला तर, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रॅव्हल्सला अचानक लाग लागल्याने आतील कर्मचाऱ्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पुढील बाजूस असणारे कर्मचारी आणी चालक बाहेर पडले मात्र, मागील दरवाजा वेळीच उघडला न गेल्याने चार जणांचा घटनेत दुर्दैवी अंत झाला.

मिळालेल्या माहिती नुसार, सुभाष सुरेश भोसले (वय ४२, रा. वारजे), शंकर शिंदे (वय ५८, रा. नऱ्हे), गुरूदास लोकरे (वय ४०, रा. हनुमान नगर, कोथरूड), राजू चव्हाण (वय ४०, वडगाव धायरी) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर, जनार्दन हुंबर्डेकर (चालक, वय ५७, रा. वारजे), संदीप शिंदे (वय.३७, रा. नऱ्हे), विश्वनाथ जोरी (वय.५२, रा. कोथरूड), विश्वास खानविलकर (पुणे), प्रविण निकम (वय ३८), चंद्रकांत मलजी (वय ५२, रा. दोघेही कात्रज) अशी जखमी झालेल्यांची असून, विश्वास कृष्णराव गोडसे, मंजिरी आडकर, विठ्ठल दिघे, प्रदिप राऊत हे सुखरूप बाहेर पडले आहेत. 

दरम्यान, बुधवार (दि.१९) रोजी आयटी पार्क फेज दोन मधील व्योम ग्राफिक्स (तिरुमाला इंडस्ट्रीअल इस्टेट) कंपनीचे कर्मचारी घेऊन टेम्पो ट्रॅव्हल्स (एमएच.१४ सीडब्लू, ३५४८) पुण्याहून हिंजवडी आयटीपार्ककडे येत होता. फेज एक मधील विप्रो सर्कल पासून पुढे आल्यावर सकाळी आठच्या सुमारास चालकाच्या पायाखालील बाजूस टेम्पोला अचानक आग लागली. चालक आणी पुढील बाजूला असणारे कर्मचारी खाली उतरले मात्र, दरवाजा वेळेवर उघडला नसल्याने मागील बाजूस असणाऱ्या चार जणांचा होरपळून मृत्यू झाला तर, सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. 

अपघात कसा घडला?

सकाळी आठच्या सुमारास टेम्पो ट्रॅव्हल्स हिंजवडी फेज एकमधून कंपनीकडे जात असताना चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. ही बाब लक्षात येताच गाडी दुभाजकाच्या बाजूला उभी करून, चालक आणि समोरील कर्मचारी तातडीने बाहेर पडले. मात्र, मागील दरवाजा उघडता आला नसल्याने मागच्या सीटवर बसलेल्या चार कर्मचाऱ्यांना बाहेर पडता आले नाही आणि त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. घटना घडताच परिसरातील नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. 

तात्काळ घटनास्थळी पोहचून जखमींना रुग्णालयात हलवले आहे. प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असावी. गाडीच्या मागील दरवाज्याच्या यंत्रणेत काही दोष होता का, याचाही तपास सुरू आहे. - कनैया थोरात : वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हिंजवडी.

Web Title: Massive fire breaks out at Tempo Travels in Hinjewadi; 4 people die as door is locked, what exactly happened?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.