मावळ तालुक्यात चोरांचा सुळसुळाट, चोरीच्या घटनांत वाढ, टोळी आल्याच्या चर्चेला पुन्हा ऊत; तत्काळ संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 03:32 AM2017-08-21T03:32:53+5:302017-08-21T03:32:53+5:30

In the Maval taluka, the discussion of thieves, stolen incidents, gang rape revived; Invitation to Police Contacting Immediate | मावळ तालुक्यात चोरांचा सुळसुळाट, चोरीच्या घटनांत वाढ, टोळी आल्याच्या चर्चेला पुन्हा ऊत; तत्काळ संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन  

मावळ तालुक्यात चोरांचा सुळसुळाट, चोरीच्या घटनांत वाढ, टोळी आल्याच्या चर्चेला पुन्हा ऊत; तत्काळ संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन  

googlenewsNext

कामशेत : मागील तीन ते चार दिवसांपासून मावळ तालुक्यातील महत्त्वाच्या शहरांसह परिसरात चोरांचा सुळसुळाट झाला असून, वाहनचोरी व भुरट्या चोºया वाढल्या आहेत. परिसरात चोर आल्याच्या चर्चांना पुन्हा ऊत आला आहे.
सहा महिन्यांपूर्वी चोरांच्या मोठ्या टोळीमुळे मावळ परिसर हादरून टाकला होता. ती अफवा असल्याचेही बोलले जात होते. मात्र, चोरांची मोठी दहशत निर्माण झाली होती. त्यातून मावळवासीय नुकतेच सावरले असताना पुन्हा चोर आल्याच्या व चोºयांच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याने चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.
दोन हजारांच्या संख्येने मावळात चोर दाखल झाले आहेत. ते रानामाळाने पळतात. त्यांच्या अंगात शर्ट नाही. पाठीवर बॅग आहे. ते वानरांसारखे घराच्या छतावरून उड्या मारतात. अशा व या प्रकारच्या विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आले होते. सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मावळातील पोलीस प्रशासनाकडे नागरिकांच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी पोलीस यंत्रणा कमी पडत होती.
या काळात गावेच्या गावे रात्र जागवत होती. गावांमधील वृद्धांसह तरुण युवक गस्ती घालत होते. लोकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली होती. रात्री सात वाजल्यानंतर घराबाहेर पडणे लोक टाळत होते. पोलीस यंत्रणाही कसून तपास करीत होती. डोंगरच्या डोंगर पालथे घालूनही चोर काही सापडत नव्हते. त्यामुळे या सर्व अफवा आहेत, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे वारंवार पोलीस अधिकाºयांकडून आवाहन केले जात होते. काही दिवसांतच या सर्वांवर पडदा पडला व नागरिकांनी सुटकेचा सुस्कारा सोडला. जनजीवन भयमुक्त झाले. पण एक आठवड्यापासून पुन्हा चोर आल्याच्या चर्चेला तोंड फुटले आहे. महत्त्वाच्या शहरांमध्ये चोºयांच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी रात्री चोर आल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. चोर आल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व तरुणांसह पोलीस यंत्रणा कामाला लागली असून, त्यांच्या हाती मात्र अजूनही काही गवसले नाही, अशी माहिती मिळते.
तीन ते चार दिवसांत लोणावळा शहरासह परिसरातील ग्रामीण भागात चोरीच्या घटना घडल्या आहेत. कामशेत येथे पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर जुना मुंबई-पुणे महामार्गाच्या सेवा रस्त्याच्या शेजारी शुक्रवारी (दि. १८) रात्रीच्या सुमारास मोटार (एमएच १४ सीके ३६०९) चोरीला गेल्याची तक्रार रामदास राणे यांनी कामशेत पोलीस ठाण्यात दिली आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरातून बाळकृष्ण शंकर गरुड यांची दुचाकी ( एम एच १४ ए के २१५१ ) झाली असून याची तक्रार कामशेत पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. कामशेत परिसरात वाहन चोरीच्या घटना वाढल्या असून शहराच्या महत्वाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची मागणी होत आहे. मागील तीन दिवसांत सहारा कॉलनी, देवराम कॉलनी, इंद्रायणी कॉलनी व इतर परिसरात रात्रीच्या वेळी चोर दिसले असल्याची चर्चा सुरू असून, परिसरातील नागरिक रात्रीचा पहारा देऊ लागले आहेत. काही ठिकाणी चोºया होत असून, स्थानिक नागरिक तक्रार करण्यास पुढे येताना दिसत नाहीत. त्यामुळे नक्की किती चोºया झाल्या, याचा निश्चित आकडा सांगणे कठीण आहे.

पोलीस चौकी सज्ज : पेट्रोलिंग सुरु

जुन्या महामार्गावरील इंद्रायणी पुलाजवळ व मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ताजे गावच्या हद्दीत पोलीस चौकी तयार केली असून, रात्री पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता चोर अथवा अज्ञात इसम आढळल्यास, तसेच चोरीची घटना घडल्यास तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कामशेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. एस. पाटील यांनी केले आहे.

वाढत्या चोºयांच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना व कारवाईच्या सूचना प्रत्येक पोलीस स्टेशन अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव व इतर सणाच्या पार्श्वभूमीवर रात्रीची स्पेशल गस्त घालण्यात येत आहे. कोठेही अनुचित प्रकार अथवा संशयित आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डी. डी. शिवथरे यांनी केले आहे.

Web Title: In the Maval taluka, the discussion of thieves, stolen incidents, gang rape revived; Invitation to Police Contacting Immediate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.