महापौर आणि आमदारांची सायकलवर रपेट ....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 04:15 PM2018-08-27T16:15:54+5:302018-08-27T16:19:22+5:30

शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वांना आरोग्यदायी असावे त्याकरिता नागरिकांनी सायकल शेअरींगचा उपक्रम सुरू केला आहे..

Mayor and MLAs on cycle .... | महापौर आणि आमदारांची सायकलवर रपेट ....

महापौर आणि आमदारांची सायकलवर रपेट ....

Next
ठळक मुद्देप्रायोगिक तत्वावर ३४ ठिकाणी सायकल शेअरींगएका महिन्यामध्ये इलू ३० अंतर्गत १०० रुपयांमध्ये ३० फे-या घेता येणार

पिंपरी : दिवसेंदिवस वाढत चाललेली वाहनांची संख्या, त्यातून उद्भवणारी वाहतुक कोंडी, प्रदुषण आणि धोक्यात आलेले सर्वसामान्यांचे आरोग्य यामुळे शहरातील प्रत्येक नागरिक हतबल आहे. आहे. परंतु, कितीही समस्या वाढल्या तरी प्रत्येकाला कर्मभूमी सोडता येत नाही. त्यामुळे या समस्यांवर मात करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यातलाच एक पर्याय म्हणून चिंचवड शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीने सायकल शेअरींग उपक्रम सुरू केला आहे. त्यासाठीच चक्कं पिंपरींचे महापौर, आमदारांनी रस्त्यावरुन रपेट मारली. 
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडमार्फत एरिया बेस डेव्हलपमेंट अंतंर्गत सार्वजनिक सायकल सुविधा प्रकल्पाचा प्रारंभ पिंपळे सौदागर ते पिंपळे गुरव सायकल चालवून आमदार लक्ष्मण जगताप, यांचे हस्ते संपन्न झाला. पिंपळे सौदागर येथील कार्यक्रमास आयुक्त श्रावण हर्डीकर,स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, शहर सुधारणा समिती सभापती सीमा चौगुले,  नगरसदस्य विठ्ठल काटे, निर्मला कुटे, शत्रुघ्न काटे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहमुख्य कार्यकारी अधिकारी निलकंठ पोमण, सह शहर अभियंता राजन पाटील सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे आदी उपस्थित होते.
  महापौर राहुल जाधव म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकमध्ये या प्रकल्पामुळे भर पडणार असून दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहतूकीच्या समस्येला आळा बसेल व नागरिकांना त्याचा लाभ होणार आहे. तसेच शहर प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वांना आरोग्यदायी असावे त्याकरिता नागरिकांनी सायकल शेअरींगचा वापर करावा, असे आवाहन महापौर राहुल जाधव यांनी केले. 
श्रावण हर्डीकर म्हणाले, राज्य व केंद्र शासनाच्या मान्यतेने पिंपरी चिंचवड शहराचा समावेश स्मार्ट सिटी शहरामध्ये झालेला असून अल्प कालावधीत शहराचा स्मार्ट सिटी आराखडा शासनाकडे पाठविण्यात आला याकामी लोकप्रतिनिधी, प्रशासन व शहरातील नागरिक यांची फार मोठया प्रमाणात मदत झालेली आहे.नागरिकांना दैनंंदिन जीवनातील त्रास कमी व्हावा त्यांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी चांगल्या योजना निर्माण करण्याचा उद्देश या स्मार्ट सिटीमध्ये आहे. भविष्यातील नियोजन लक्षात घेता टप्या-टप्याने हे शहर स्मार्ट व सुंदर करण्याकरिता सर्वांनी सहकार्य करावे भविष्यात सार्वजनिक वाहतूक सुविधेला सक्षम करावे लागेल पादचा-यासाठी फुटपाथ सुविधे बाबत व सायकल स्वरांसाठी सुविधा देणे गरजेचे आहे. त्यांचे नियोजन या प्रकल्पात करण्यात आलेले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले 
प्रायोगिक तत्वावर ३४ ठिकाणी सायकल शेअरींग
पिंपळे सौदागर व्दारकाधीश सोसायटी, कुंजीर गार्डन, कुणाल आयकॉन रोड, साई गार्डन, गोविंद यशदा चौक बीआरटीएस, पी.के. चौक बीआरटीएस, निसर्ग निर्मिती सोसायटी बीआरटीएस,रहाटणी रोड राधिका शॉप, शिवाजी पुतळा चौक, महादेव मंदिर आरक्षित नं ३६१ गार्डन, काटे पुरम चौक बीआरटीएस,  पिंपळे गुरव जवळकर चौक बीआरटीएस, सेव्ह ट्री चौक, शिव गणेश चौक, शिरोडे रोड ब्लयू डार्ट आॅफिस, काटेपूरम चौक कुंदन सुपर मार्केट, रामकृष्ण चौक, दापोडी रोड आरक्षण क्र ३४७, गायत्री मेडीकल स्टोअर दापोडी रोड, आदी सायकल शेअरींगचे ठिकाणे असणार आहे. या योजनेचा लाभ ३१ आॅगस्ट २०१८ अखेर सवलतीच्या दरामध्ये नागरिकांना घेता येईल एका महिन्यामध्ये इलू ३० अंतर्गत १०० रुपयांमध्ये ३० फे-या घेता येतील व यापुढे दर अर्ध्या तासाला रक्कम रुपये ५ असतील. 

Web Title: Mayor and MLAs on cycle ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.