महापौरांनी राजीनामा देण्याची मागणी
By admin | Published: May 9, 2017 03:38 AM2017-05-09T03:38:59+5:302017-05-09T03:38:59+5:30
मुंबई उच्च न्यायालयाने जातपडताळणी प्रमाणपत्र रद्द केल्याने महापौर नितीन काळजे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भारत गणराज्य पार्टीने केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : मुंबई उच्च न्यायालयाने जातपडताळणी प्रमाणपत्र रद्द केल्याने महापौर नितीन काळजे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भारत गणराज्य पार्टीने केली आहे.
महापौर काळजे यांनी नागरिकांच्या मागास प्रवर्गातून पद मिळविले आहे. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने काळजे यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र रद्द केले आहे. त्याचप्रमाणे जातपडताळणी समितीला फेरपडताळणी करून चार महिन्यांत अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने आपल्या अंतिम आदेशामध्ये ‘राजीनामा द्यावा’ अशा स्वरूपाचा आदेश न दिल्यामुळे काळजे सोईस्कर अर्थ लावून त्यातून पळवाट काढत आहेत.
काळजे यांनी राजीनामा देऊन खऱ्या ओबीसी प्रवर्गातील व्यक्तीला महापौर होण्यासाठी जागा खुली करावी, अशी मागणी अॅड. सतीश कांबिये यांनी केली आहे.