प्राधिकरणात होणार महापौर निवास - राहुल जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 01:24 AM2018-09-28T01:24:06+5:302018-09-28T01:24:27+5:30

माजी महापौरांच्या अनुभवाचा, त्यांच्या विकासासंदर्भात सूचना व मार्गदर्शन घेण्यासाठी माजी महापौरांची बैठक महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्राधिकरणात महापौर निवास करण्यास गती देणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

 Mayor residence in the Authority - Rahul Jadhav | प्राधिकरणात होणार महापौर निवास - राहुल जाधव

प्राधिकरणात होणार महापौर निवास - राहुल जाधव

googlenewsNext

पिंपरी : माजी महापौरांच्या अनुभवाचा, त्यांच्या विकासासंदर्भात सूचना व मार्गदर्शन घेण्यासाठी माजी महापौरांची बैठक महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्राधिकरणात महापौर निवास करण्यास गती देणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
माजी महापौर ज्ञानेश्वर लांडगे, रंगनाथ फुगे, कविचंद भाट, आर. एस. कुमार, संजोग वाघेरे, अनिता फरांदे, वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, नितीन काळजे, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, डॉ.अनिल रॉय उपस्थित होते. माजी महापौरांच्या वतीने महापौर जाधव यांचा सत्कार केला.
अनिता फरांदे म्हणाल्या, ‘‘महापालिकेतर्फे शहरात कॅन्सर रुग्णांसाठी हॉस्पिटल बांधावे. त्यासाठी दोन एकर जागा आरक्षित ठेवावी.’’
वैशाली घोडेकर म्हणाल्या, ‘‘माजी महापौर संघटनेचे ज्येष्ठ महापौरांना अध्यक्ष करावे. महापालिका सभेत माजी महापौरांनी हात वर केल्यास बोलण्याची संधी द्यावी. ज्येष्ठ नागरिक महासंघास कार्यालयासाठी जागा, हॉॅल द्यावा.’’
अपर्णा डोके म्हणाल्या, ‘‘सावित्रीबाई फुले स्मारकामध्ये महिलांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत. तेथे वाचनालय, स्पर्धा परीक्षा केंद्र, महिलांसाठी लघुउद्योग सुरू करावेत. शहरात सध्या डेंगी, स्वाइन फ्लूची साथ आहे. त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात.’’
आर. एस. कुमार म्हणाले, ‘‘शहरास सध्याचा पाणीपुरवठा अपुरा आहे. भामा आसखेड- आंद्रा प्रकल्पाचे पाणी शहरात लवकर करावे. पवना बंद जलवाहिनीचे काम पूर्ण करावे.’’
ज्ञानेश्वर लांडगे म्हणाले, ‘‘शहरात जनावरांसाठी दवाखाने सुरू करावेत.’’
रंगनाथ फुगे म्हणाले, ‘‘निगडीपर्यंत मेट्रो करावी. मेट्रोला पिंपरी-चिंचवड मेट्रो नाव द्यावे. माजी महापौरांसाठी विमा सुरू करावा. मेट्रोशेजारी बीआरटी आहे. त्यामधून खासगी वाहने जातात. त्याला प्रतिबंध करावा. माजी महापौरांना निमंत्रणपत्रिका देण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नेमावा. पाच डायऱ्या द्याव्यात.’’
बैठकीतील सूचनांचे पालन करू, असे महापौर जाधव यांनी सांगितले.

कविचंद भाट म्हणाले, ‘‘महापालिकेच्या कार्यक्रमांना माजी महापौरांना निमंत्रित करावे. एका प्रतिनिधीला स्टेजवर बसवावे. तसेच पहिल्या रांगेत माजी महापौरांसाठी जागा राखीव ठेवावी. माजी महापौरांची संघटना तयार करावी. त्यांच्यासाठी महापालिकेत जागा मिळावी. दोन महिन्यांनी बैठक घ्यावी. माजी महापौरांच्या निवासस्थानाचे फलक लावावेत.’’
प्राधिकरणात कॅन्सर हॉस्पिटलसाठी जागा उपलब्ध करुन दिली होती. परंतु तेथे कोणतीही संस्था पुढे आली नाही. वेतन कमी असल्याने महापालिकेत डॉक्टर उपलब्ध होत नाहीत. चिखलीत मोठे हॉस्पिटल बांधण्यात येईल. तेथे १०० बेडचे आरक्षण कॅन्सर रुग्णांसाठी ठेवण्यात येईल.

Web Title:  Mayor residence in the Authority - Rahul Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.