भांडणं सोडवण्यासाठी मध्यस्थी केली; तरुणाने पोलिसालाच कानाखाली मारली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 10:55 AM2021-08-10T10:55:35+5:302021-08-10T10:55:54+5:30

चोवीस वर्षीय तरुणाला अटक

Mediated to settle the dispute; The youth slapped the police under the ear | भांडणं सोडवण्यासाठी मध्यस्थी केली; तरुणाने पोलिसालाच कानाखाली मारली

भांडणं सोडवण्यासाठी मध्यस्थी केली; तरुणाने पोलिसालाच कानाखाली मारली

Next
ठळक मुद्देसरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पिंपरी : भांडणे सोडविण्यास गेलेल्या पोलिसाला धक्काबुक्की करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तरुणाला अटक केली आहे. अथर्व हॉटेल समोर, जुना जकात नाका, मोशी येथे सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. सुजित चंद्रकांत जाधव (वय २४, रा. हनुमान नगर, भोसरी), असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस कर्मचारी संजय बाबासाहेब थेटे यांनी या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी संजय थेटे हे कर्तव्यावर होते. त्यावेळी अक्षय सोपान हजारे आणि सुजित जाधव व त्याचे वडील चंद्रकांत ज्ञानेश्वर जाधव (वय ५४) यांच्यात भांडण सुरू होते. त्यावेळी थेटे हे त्यांच्यातील भांडण सोडवण्यासाठी गेले असता सुमितने यांच्या वर्दीच्या शर्टची कॉलर पकडली.

तू आमच्यामध्ये कशाला येतो, असे तो थेटे यांना म्हणाला. त्यानंतर त्यांच्या डाव्या गालावर चापट मारून धक्काबुक्कीही केली. सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी सुजित जाधव याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत साकोरे तपास करीत आहेत.

Web Title: Mediated to settle the dispute; The youth slapped the police under the ear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.