शहरातील ५९ मैदानांवर रंगणार सभांचा फड
By admin | Published: February 12, 2017 05:17 AM2017-02-12T05:17:48+5:302017-02-12T05:17:48+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सभा आणि कोपरा सभा घेण्यास मैदाने, हॉलची निश्चिती केली आहे. त्यासाठी भूमी आणि जिंदगी विभागाच्या
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सभा आणि कोपरा सभा घेण्यास मैदाने, हॉलची निश्चिती केली आहे. त्यासाठी भूमी आणि जिंदगी विभागाच्या वतीने भाडेही निश्चित केले आहे. शहर परिसरातील सुमारे ८० ठिकाणी विविध पक्षांना कोपरा सभा घेता येणार आहे. ५९ ठिकाणी सभांना परवानगी देण्यात येणार आहे. एक खिडकी योजनेतून यासंबंधी परवानगी घेणे बंधनकारक आहे.
वाहतुकीला अडथळा नको म्हणून शहरातील प्रमुख चौकांत महापालिका निवडणुकीच्या जाहीर प्रचारसभांना बंदी घातली. आजवर प्रचारसभांसाठी प्रसिद्ध असलेल्या चापेकर चौक (चिंचवडगाव), डिलक्स चौक, शगुन (पिंपरी कॅम्प), गणपती, काटे पूरम (सांगवी) आदी चौकांच्या ठिकाणी यापुढे सभा घेता येणार नाहीत.
निवडणुकीच्या प्रचारासाठी शहरातील विविध प्रमुख चौकांमध्ये राजकीय पक्षांकडून नेत्यांच्या सभांचे आयोजन करण्यात येत असते. या सभांमुळे चौकात, तसेच आजूबाजूंच्या भागात मोठी वाहतूककोंडी होते. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. सभांसाठी ५९ मैदाने निश्चित केली आहेत.
शहरातील ठरावीक मैदाने, शाळा-महाविद्यालयांची मैदाने या ठिकाणीच सभांना परवानगी देण्यात आली आहे. परवानगी देण्यात आलेल्या चौकांसह मैदाने व सभागृहांचे शुल्कदेखील ठरवून दिले आहे. (प्रतिनिधी)
अ क्षेत्रीय कार्यालय : महात्मा फुले प्राथमिक शाळा मैदान (चिंचवड स्टेशन), कै. गंगाराम बहिरवाडे मैदान (चिंचवड स्टेशन), माता रमाबाई भीमराव आंबेडकर मुले शाळा (अजंठानगर), विद्यानिकेतन शाळा (निगडी), स्वामी विवेकानंद विद्यामंदिर मैदान (काळभोरनगर), श्रीमती लीलाबाई कांतीलाल खिंवसरा विद्यालय मैदान (मोहननगर), सोपान काळभोर माध्यमिक विद्यालय (काळभोरनगर), प्राथमिक शाळा (रावेत), उर्दू माध्यमिक विद्यालय मैदान (आकुर्डी), कै. सदाशिव बहिरवाडे महापालिका शाळा मैदान (चिंचवडस्टेशन), कै वसंतदादा पाटील शाळा मैदान (आकुर्डी), विकासनगर किवळे शाळा मैदान (किवळे), कीर्ती विद्यालय मैदान (प्राधिकरण), महापौर नियोजित बंगल्याचे मैदान (निगडी प्राधिकरण), राष्ट्रमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन (मोहननगर).
ब क्षेत्रीय कार्यालय : वनदेवनगर खेळाचे मैदान (थेरगाव), मोरया क्रीडांगण (केशवनगर), मोकळी जागा (केशवनगर), प्रेमलोक शाळा मैदान (चिंचवडगाव), भुजबळवस्ती प्राथमिक शाळा मैदान (पुनावळे).
क क्षेत्रीय कार्यालय : करसंकलन कार्यालय मैदान (सांगवी), दीनदयाळ शाळा मैदान (संत तुकारामनगर), माध्यमिक शाळा मैदान (खराळवाडी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मैदान (पिंपरी), कामगारनेते नारायण मेघाजी लोखंडे कामगारभवन
(पिंपरी), बालभवन हॉल (खराळवाडी), संत रोहिदास हॉल (संत तुकारामनगर).
ड क्षेत्रीय कार्यालय : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मैदान (पिंपरी), विद्यानिकेतन प्राथमिक विद्यालय (पिंपरीगाव), शाळा मैदान (पिंपळे - निलख), प्राथमिक कन्या शाळा (रहाटणी), प्राथमिक - माध्यमिक विद्यालय (पिंपळे - गुरव), मुलांची शाळा (पिंपरी गाव), कुणाल आयकॉनलगतचे नियोजित क्रीडांगण (पिंपळे - सौदागर), वै. दत्तोबा रामचंद्र काळे इंग्लिश मीडियम स्कूल (काळेवाडी), माध्यमिक विद्यालय (पिंपरीनगर), कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय (पिंपरीगाव).
ई क्षेत्रीय कार्यालय : प्राथमिक शाळा मैदान (चऱ्होली), प्राथमिक शाळा मैदान (काळजेवाडी), प्राथमिक शाळा (ताजणेमळा), प्राथमिक शाळा (वडमुखवाडी), प्राथमिक शाळा (चोविसावाडी), प्राथमिक शाळा (बुर्डेवस्ती), प्राथमिक शाळा (वठारेवस्ती), नवीन शाळा (मोशी), नवीन शाळा (चऱ्होली), नवीन शाळा (दिघी), विस्तारीत शाळा (बोठहाडीवाडी), महापालिका शाळा (डुडुळगाव), प्राथमिक शाळा (इंद्रायणीनगर), सावित्रीबाई शाळा (भोसरी), गावजत्रा मैदान (भोसरी).
फ क्षेत्रीय कार्यालय : अण्णासाहेब मगर स्टेडियम (नेहरुनगर), कै. सदाशिव बहिरवाडे मैदान (शाहूनगर), हेडगेवार क्रीडासंकुल (अजमेरा कॉलनी), कै गजानन म्हेत्रे क्रीडांगण (कृष्णानगर, म्हेत्रेवाडी), शनि मंदिर मैदान (पूर्णानगर), स्पाईन रोड मोकळी जागा (शरदनगर चिखली), अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक भवन (निगडी), स्वामी विवेकानंद क्रीडांगण (संभाजीनगर).