पिंपरी-चिंचवड महापालिकेत होणार मेगा शिक्षकभरती; जाणून घ्या सविस्तर
By ज्ञानेश्वर भंडारे | Published: December 1, 2022 07:49 PM2022-12-01T19:49:54+5:302022-12-01T19:50:01+5:30
मराठी १४०, हिंदी १३, उर्दू १४ अशी रिक्त पदे भरणार आहेत..
पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये मानधन तत्त्वावर उपशिक्षकांची भरती होत आहे. शाळांमध्ये एकूण १६७ जागा रिक्त आहेत. मानधन तत्त्वावर २८५ शिक्षकांची भरती होणार आहे, असे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले. त्यांतील मराठी १४०, हिंदी १३, उर्दू १४ अशी रिक्त पदे भरणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत सध्या ३४ हजार ७३५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोना महामारीत शाळा ऑनलाइन सुरू होत्या. तसेच काही शिक्षक या काळात सेवानिवृत्त झाले. त्यात विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक कमी पडत होते. मात्र कोरोना महामारीने ही भरती लांबणीवर गेली.
महापालिकेच्या एकूण २३ शाळा मुख्यध्यापकांविना सुरू आहेत. यात मराठी २१ आणि उर्दू २ अशी पदे रिक्त आहेत. कोरोनामध्ये सेवानिवृत्ती झाल्यावर ही पदे रिक्त झाली. ती आतापर्यंत रिक्तच आहेत. त्यामुळे ही पदे लवकर भरावीत, अशी मागणी शिक्षक, विद्यार्थी आणि पालकवर्ग करीत आहे.
शिक्षकभरती ही पवित्र पोर्टलद्वारे होत असते. सध्या महापालिका शाळेत रिक्त असलेली पदे आता महापालिका भरत आहे. ही पदे मानधन तत्त्वावर आहेत.
- संदीप खोत, उपायुक्त, महापालिका.