पिंपरी महापालिकेच्या स्थायी समिती सभेत 'राडा'; सत्ताधारी सदस्यांनी फाईल भिरकावत केली तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 07:33 PM2020-11-04T19:33:46+5:302020-11-04T19:34:23+5:30

भाजपच्या दोन नगरसेवकांनी गोंधळ घातला

Members of the ruling party smashed the mic and glass at the Pimpri Municipal Corporation Standing Committee meeting | पिंपरी महापालिकेच्या स्थायी समिती सभेत 'राडा'; सत्ताधारी सदस्यांनी फाईल भिरकावत केली तोडफोड

पिंपरी महापालिकेच्या स्थायी समिती सभेत 'राडा'; सत्ताधारी सदस्यांनी फाईल भिरकावत केली तोडफोड

Next

पिंपरी : टक्केवारीवरून मागील आठवडयाची स्थायी समिती तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात स्थायी समिती सभेत वाद झाला आहे. आचारसंहितेत सभा कामकाज करता येत नाही, असे स्पष्ट असताना चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या दोन नगरसेवकांनी गोंधळ घातला. सभा तहकूबीचा निरोप का दिला नाही, यावरून काचेचा ग्लास फोडला, फाइल भिरकवून ध्वनीवर्धकही तोडला.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा बुधवारी झाली. अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. कोरोना कालावधीत सभा कामकाज ऑनलाईन पद्धतीने घ्यावे अशा सूचना आहेत. त्यामुळे समितीचे कामकाज ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक  जाहीर झाली आहे. पालिका पदाधिकांऱ्यांची वाहने काढून घेतली आहेत. असे असताना सभा घ्या असा अट्टहास भाजपच्या काही सदस्यांनी धरला होता. त्यामुळे सभेचे कामकाज झाले. सभागृहात अध्यक्ष संतोष लोंढे, भाजपचे अंबरनाथ कांबळे, शशिकांत कदम आणि अभिषेक बारणे हे चार सदस्य उपस्थित होते. तसेच इतर काही सदस्य ऑनलाईनवरही गैरहजर होते. तसेच आयुक्त श्रावण हर्डीकर शासकीय कामानिमित्त मुंबईला गेल्याने त्यांच्याऐवजी अतिरिक्त आयुक्त अजित पवार प्रमुख म्हणून उपस्थित होते. नगरसचिव उल्हास जगताप, उपायुक्त सुभाष इंगळे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमन, कार्यकारी अभियंता देवन्न गट्टूवार, संजय घुबे,  उपस्थित होते.
 

सभा कामकाजात उपस्थितांचे स्वागत करुन अध्यक्षांनी शुक्रवारपर्यंत सभा तहकूब केली. ते सभागृहातून बाहेर पडले. त्यांनतर भाजप नगरसेवकांनी अजित पवार यांच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली. सभा तहकूब होण्याचा निरोप आम्हाला अगोदर का सांगितला नाही, असा आक्षेप घेतला. आयुक्त का गैरहजर आहेत.आम्ही त्यांचा निषेध करायचा का, असे सुनावले. तसेच एका नगरसेवकाने ग्लास फोडला तर दुसऱ्याने फाईल भिरकावली, माईकची तोडफोड केली. अचानक घडलेल्या घटनेने अधिकारीही अवाक् झाले.
..........
चिंचवड विरूद्ध भोसरी असे गटबाजी
विविध विषयांवरून आता चिंचवड विधानसभेतील सदस्य आणि भोसरी विधानसभेतील सदस्य अशी गटबाजी सुरू झाली आहे. अध्यक्ष हे भोसरी विधानसभेतील असल्याने त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चिंचवडकरांकडून केला जात आहे.

Web Title: Members of the ruling party smashed the mic and glass at the Pimpri Municipal Corporation Standing Committee meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.